Mosquitoes Remedies : घरात सायंकाळी भरते डासांची जत्रा, हे उपाय कराल तर डास चुकूनही घरात पाय ठेवणार नाहीत

काहीवेळा डासांसाठी असलेले उपायांनी अपघातही होतात
Mosquitoes Remedies
Mosquitoes Remediesesakal
Updated on

Mosquitoes Remedies :

पूर्वीच्या काळात कडुलिंब, मसाल्याची झाडे घराभोवती असायची. त्यामुळे, डासांची पैदास फारशी नसायची. पण, सध्या सायंकाळ झाली की घरभर डासांची जत्रा भरते. त्यावर अनेक उपाय आहेत पण तेही तात्पुरते काम करतात. ज्याने डास तर मरतच नाहीत.

काहीवेळा डासांसाठी असलेले उपायांनी अपघातही होतात. तर त्यांच्या वासाने घशाचे आजारही होतात. लहान मुलांच्या खोलीत जेव्हा डासांची क्वाईल लावली जाते तेव्हा ते सांगूनही ऐकत नाही. ते क्वाईल पकडायला जाते. त्यामुळे त्याला इजा होऊ शकते. तर लिक्विडने मुलांना त्रासही होतो.

Mosquitoes Remedies
How To Get Rid of Mosquitoes : हे पाच घरगुती उपाय ट्राय करा, घरात एकही डास दिसणार नाही

या उपायांशिवाय डासांचा प्रादुर्भाव कमी करण्याचा एक सरळ सोप्पा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डासांच्या या उपायाने घरातील हवाही शुद्ध होईल आणि ज्याचा आपल्याला त्रासही होणार नाही.

डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जो उपाय करणार आहोत, त्यासाठी कडुलिंबाची पाने (कोरडी), 8 ते 10 तमालपत्र, लसूण साले, कांद्याची साले, 3 ते 4 लवंग, 1 लवंग आणि कापूर लागेल.

Mosquitoes Remedies
Mosquito Problem : डास प्रतिबंधासाठी शासकीय कार्यालयांना पत्र; मनपा मलेरिया विभागातर्फे कार्यवाही

आता हा उपाय कसा बनवायचा ते पाहुयात. सर्व प्रथम सुक्या कडुलिंबाची पाने कुस्करून घ्या, नंतर त्यात लसणाची साले, तमालपत्र, लवंगा आणि कापूर एकत्र करा आणि ग्राइंडरमध्ये बारीक करा. नंतर पावडर सारखे झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

Mosquitoes Remedies
Dengue mosquito : डेंगी वाहक डासांच्या अंड्यांचे गूूढ उकलले

आता रोज संध्याकाळी ही पावडर मातीच्या दिव्यात टाकून त्यात कापूरचा तुकडा टाकून जाळून टाका. हा दिवा अशा ठिकाणी ठेवा की त्याचा धूर संपूर्ण घरात पसरेल. मग पहा डास घरातून कसे पळून जातात.

ही पावडर बनवताना वापरल्या जाणाऱ्या घटकांचा वास डासांना आवडत नाही, म्हणून ही गावठी उपाय रेसिपी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.