या देशातील लोक लैंगिक संबंधापासून का राहत आहेत दूर?

Physical Relationship
Physical RelationshipTeam e Sakal
Updated on

अमेरिकेतील लोकांमध्ये शारीरिक संबंध करण्याची इच्छा सतत कमी होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आले आहे. या अहवालानुसार अमेरिकन लोकांची लैंगिक संबंधातील विशेषतः कॅज्युअल सेक्समधील आवड खूपच कमी झाली आहे. सर्वेक्षणात सुमारे ३० टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी कमीत कमी एक वर्ष सेक्स केला नाही. २०११ आणि २०१९ दरम्यान अमेरिकन तरुणांच्या लैंगिक सवयींच्या तुलनेच्या आधारे नॅशनल सर्व्हे ऑफ फॅमिली ग्रोथच्या डेटाच्या आधारे संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.(physical relationship news)

अभ्यास काय म्हणतो?

आकडेवारीनुसार, अमेरिकेतील तरुण लैंगिक संबंध ठेवणे कमी करत आहेत. जोडीदारासोबत राहूनही ते शारीरिक संबंधात रस दाखवत नाहीत. सर्वेक्षणात सामील अनेक महिलांनी अनेक वर्षांपासून लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत. तथापि अहवालानुसार जोडीदारासोबत राहणाऱ्या किंवा विवाहित लोकांच्या तुलनेत एकटे राहणाऱ्यांमध्ये लैंगिक संबंधाशिवाय राहणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे.

Physical Relationship
Holiday Calendar | 2022 मध्ये आहेत इतक्या सुट्ट्या

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या विवाहितांपैकी केवळ पाच टक्के लोकांनी या वर्षी लैंगिक संबंध न ठेवल्याचे सांगितले. २०११ पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये तरुणांची संख्या ४०% वरून ३२% पर्यंत घसरल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. विवाहित लोकांना लैंगिकदृष्ट्या सक्रिय मानले जाते, परंतु सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, लग्नाला उशीर झाल्यामुळे लोकांचा सेक्समध्ये रस कमी होत आहे. विशेषतः महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 'दर चार अमेरिकन महिलांपैकी एका महिलेने लैंगिक संबंध ठेवून दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झालेला आहे.

सर्वेक्षणातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट २५ वर्षांवरील वयोगटातील महिलांमध्ये दिसून आली. काही वर्षांपूर्वी लैंगिकदृष्ट्या सक्रिय असूनही, वीसपैकी एका महिलेने लैगिक संबंध ठेवून १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झाला आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोनादरम्यान आणि नंतर लोकांच्या लैंगिक जीवनात बरेच बदल दिसून आले आहेत. महामारीचा लोकांच्या लैंगिक जीवनावरही खूप परिणाम झाला आहे.

Physical Relationship
Bridal Tips : ओव्हरसाईज मुलींनी लग्नात लेहेंगा खरेदी करताना घ्यावी ही काळजी

सेक्सपासून दूर राहण्याची कारणे

अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून तरुणांच्या लैंगिक इच्छा कमी होण्याचे कारण शोधण्यासाठी संशोधन करत आहेत. स्कॉट साउथ आणि लेई लेई यांनी त्यांच्या एका अभ्यासात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. नातं दीर्घकाळ न टिकणे, लग्नापासून किंवा इतर सामाजिक चालीरितींपासून दूर राहणे, सोशल मीडियाचा अतिवापर, अति मद्यपान, व्हिडिओ गेमचे व्यसन आणि पोर्नोग्राफी या गोष्टीही लैंगिक जीवन बिघडवण्याचे काम करतात. तज्ज्ञांच्या मते, कोरोनामुळे आयसोलेशनमध्ये राहिल्यामुळे या सवयींना आणखी प्रोत्साहन मिळाले आहे. एकांतात राहण्याची सवयही लोकांमध्ये वाढत आहे. तरुणांमध्ये सेक्सची इच्छा कमी करण्यासाठी या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.