Mother's Day 2024 : ..गोष्ट पाळणाघरात रमलेल्या आईची! मुलीच्या संगोपणासाठी 'तिने' दिला नोकरीचा राजीनामा

कुटुंबीयांशी चर्चा करून मनातील कल्पना त्यांच्यासमोर मांडली. त्यांनी जाधववाडीत मीरा पाळणाघर सुरू केले.
Mother's Day 2024 Chitra Bhoi
Mother's Day 2024 Chitra Bhoiesakal
Updated on
Summary

माझे पती आशुतोष भोई वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक आहेत. दुसऱ्यांच्या मुलांना आईसारखी वागणूक देण्याचा रोल निभवणार असशील, तर पाळणाघर सुरू कर, असा त्यांचा सल्ला. - चित्रा भोई

कोल्हापूर : ‘‘जन्माला आलेली पहिली मुलगी विशेष (स्पेशल). तिच्या संगोपणासाठी (Child Rearing) नोकरीचा राजीनामा दिला. पाच वर्षे तिची देखभाल केल्यानंतर ती ऐंशी टक्के बरी झाली. आजही ती वीस टक्के माझ्यावर अवलंबून आहे. नोकरी करणाऱ्या महिला मुलांकडे कसे लक्ष देत असतील, असा विचार करून पाळणाघर सुरू करण्याची कल्पना सुचली. मार्केट यार्ड परिसरातील जाधववाडीत ‘मीरा पाळणाघर’ सुरू करून अडीच वर्षे झाली. मुलांना सांभाळण्यासाठी आईची भूमिका वठवावी लागते,’’ असे सांगणाऱ्या चित्रा भोई यांच्या वाटेवरील सुख-दु:खाचे प्रसंग उलगडणारी ही कहाणी.

पोटी जन्माला आलेल्या मुलांचा सांभाळ करणे, ही जशी आनंदयात्रा, तशी इतरांच्या मुलांची आई बनून त्यांना सांभाळण्यातला गोडवा काही औरच असतो, असे त्या ठळकपणे अधोरेखित करतात. भोई यांचे शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमधून शालेय, तर विवेकानंद महाविद्यालयातून (Vivekananda College) पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. शिवाजी विद्यापीठातून (Shivaji University) त्यांनी एम.ए.ची पदव्युत्तर पदवी मिळवली. त्या महावितरणमध्ये २००६ ला लिपिक पदावर रुजू झाल्या. त्यांनी २००९ पर्यंत तेथे नोकरी करून राजीनामा दिला.

Mother's Day 2024 Chitra Bhoi
Mothers Day 2024 : मदर्स डेची सुरूवात जिने केली तिलाच तो बंदही करायचा होता? कारण...

त्यांना २०१२ ला पहिली मुलगी झाली. कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आल्याने आनंदाचे वातावरण. मात्र, ती स्पेशल असल्याने सारेच धास्तावले. या परिस्थितीत भोई यांनी न डगमगता मुलीची उत्तम प्रकारे देखभाल करण्याचे निश्‍चित केले. राधाच्या फिजिओथेरपीसाठी त्यांचा दिवस जाऊ लागला. या उपचार पद्धतीतून हळूहळू तिच्यात सुधारणा घडून आली. ती पाच वर्षांची झाल्यानंतर त्या पुन्हा शिवाजी विद्यापीठात लिपिक पदावर भरती झाल्या. नोकरी सांभाळून राधाची देखभाल करताना नोकरदार महिला त्यांच्या मुला-मुलींसाठी किती वेळ देत असतील, असा विचार त्यांच्यासमोर आला. या मुलांसाठी काय करता आले तर, असा विचार त्यांच्या मनात घोळला आणि त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला.

Mother's Day 2024 Chitra Bhoi
Mothers Day 2024 : तब्बल एक हजारांहून अधिक मातांकडून 'दूध दान'; काय खासियत आहे मिल्क बॅंकेची?

कुटुंबीयांशी चर्चा करून मनातील कल्पना त्यांच्यासमोर मांडली. त्यांनी जाधववाडीत मीरा पाळणाघर सुरू केले. कदमवाडी, गांधीनगर परिसरातील मुले व मुली पाळणाघरात असून, त्यांना सांभाळण्याचे काम त्या करतात. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहापर्यंत त्या त्यांच्यात रमतात. तसेच त्यांना आईची आठवण येणार नाही, याकरिता आईप्रमाणेच त्यांचे हट्ट पुरवतात. बारा वर्षीय राधा व चार वर्षांची दुसरी मुलगी मीरा पाळणाघरातील मुलांत खेळण्या-बागडण्यात रमून जातात.

Mother's Day 2024 Chitra Bhoi
Mother's Day 2024 : आई आणि मुलांच्या शारिरीक अन् मानसिक विकासासाठी फायदेशीर योगासने, जाणून घ्या सरावाची योग्य पद्धत

माझे पती आशुतोष भोई वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक आहेत. दुसऱ्यांच्या मुलांना आईसारखी वागणूक देण्याचा रोल निभवणार असशील, तर पाळणाघर सुरू कर, असा त्यांचा सल्ला. सासू रत्नप्रभा व सासरे रमेश भोई यांचाही पाळणाघरासाठी प्रोत्साहन मिळाले. माझी आई श्रीमती मंगल सुपेकर हिच्या सहकार्यामुळे मातृत्त्वाचे काम उत्तमरीत्या सुरू आहे.

-चित्रा आशुतोष भोई, मीरा पाळणाघर, जाधववाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.