MPox: 'मंकीपॉक्स’चा धोका वाढला! आरोग्यविभाग अ‍ॅक्शन मोडवर, विमानतळावर चाचणी करण्याचे निर्देश

जगभरात मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत आहे. हा आजार शेजारच्या पाकिस्तानपर्यंत धडकला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ‘हाय अलर्ट’ दिला असून खबरदारीची उपयोजना करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
Mpox
MpoxSakal
Updated on

Mpox: जगभरात मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत आहे. हा आजार शेजारच्या पाकिस्तानपर्यंत धडकला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ‘हाय अलर्ट’ दिला असून खबरदारीची उपयोजना करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील मेडिकल-मेयोत या आजाराच्या रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहे. तसेच नागपूर विमानतळावरही संशयितांची चाचणी करण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मेडिकल-मेयोला पत्र देत आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.