School Rikshaw Tracking APP: मुलांना शाळेत सोडणारी ऑटोरिक्षाही करता येणार 'ट्रॅक'; मुलांच्या सुरक्षेसाठी तयार केलं खास अ‍ॅप

Auto Rikshaw Tracking App: पाल्य घरी सुखरूप पोहोचल्याचे ‘मुदीता ॲप’च्या माध्यमातून कळणार आहे.
Kids Safety App
Kids Safety Appesakal
Updated on

पालकांनो, आता ऑटोरिक्षात मुलांची चिंता करू नका!

Mudita App : ऑटोमधून पाल्य शाळेत अथवा शिकवणीला गेल्यानंतर घरी सुखरूप पोहोचला का? याबाबत पालक नेहमीच चिंतेत असतात. मात्र, आता ही काळजी करण्याची गरज नाही. कारण लवकरच शहरातील ऑटोरिक्षांमध्ये जीपीएस आणि बायोमॅट्रिकची सेवा उपलब्ध होणार आहे. त्यातूनच पाल्य घरी सुखरूप पोहोचल्याचे ‘मुदीता ॲप’च्या माध्यमातून कळणार आहे.

शाळेच्या स्कूल व्हॅनबाबत पालकांना चिंता नसते. कारण ती शाळेशी संलग्न असते. ऑटो चालकांवर विश्वास असला तरी पालकांच्या मनात भीती ही असतेच. पण आता ही समस्या लवकरच दूर होणार आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या सर्वच ऑटोरिक्षांमध्ये जीपीएस आणि बायोमॅट्रिक यंत्रणा बसविली जाणार आहे. एका नागपूरकराने या संदर्भात एक ‘ॲप’ तयार केले आहे.

Kids Safety App
Women Safety Tools : महिलांनो हे 5 सेफ्टी टूल्स कायम जवळ ठेवा, सुरक्षेसाठी बेस्ट अन् Easy To carry

पालकांनो, आता ऑटोरिक्षात मुलांची चिंता करू नका!

ही सुविधा ऑगस्ट महिन्यात सेवेत येणार आहे.

मुलींसाठी विशेष ऑटोरिक्षा

मुदीता ॲपचे निर्माता गोपाल शर्मा यांना आपल्या मुलीला शाळेत पाठविताना एक दिवस अडचण निर्माण झाली. स्कूल व्हॅन निघून गेली. तेव्हा शाळेत पाठविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. ऑटो चालकावर अविश्वास आणि वेळेवर तो उपलब्ध नसल्याने त्यांनी यातून धडा घेतला. त्यांना पालकांच्या मनात असलेली ही भीती दूर करण्यासाठी ॲपची कल्पना सुचली. त्यांनी याचा सर्वे केला आणि आता ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. पुढल्या महिन्यात त्याचा वापर सुरू करण्यात येणार आहे. यात मुलींसाठी विशेष ऑटो असणार आहेत.

कोट

ऑटोत जीपीएस लागणार असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक आणखी सुरक्षित होईल. पालकांच्या मनात भीती राहणार नाही. तसेच ऑटो चालकांसाठीही सोयीचे होईल. त्यांच्यावर शंका घेण्यात येणार नाही.

विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन विलास भालेकर यावर म्हणाले, आम्ही शहरातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोत जीपीएस आणि बायोमॅट्रिक लावणार आहोत. त्यासाठी ऑटो चालकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र, पालकांकडून नाममात्र शुल्क घेऊ. मुलांना सुरक्षा देणे हा आमचा सामाजिक उपक्रम आहे. कदाचित भारतात हा पहिला उपक्रम असू शकतो. त्याचे नागपूर एक उदाहरण राहील. (App)

Kids Safety App
Yatri App : नेत्रहीन प्रवाशांना ‘यात्री’ ॲपमधील बदलांमुळे गाडीची स्थिती ऐकता येणार

ऑटोत बसविण्यात येणारे जीपीएस आणि बायोमॅट्रिक ‘मुदीता ॲप’च्या माध्यमातून कनेक्ट राहील. त्यात ऑटो चालकाची संपूर्ण माहिती राहणार आहे. बायोमॅट्रिक मध्ये मुलांचा थंब आणि ऑटो चालकांचे थंब राहील. (Automobile)

विद्यार्थी घरून ऑटोत बसताच त्याला थंब स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतर शाळेत उतरल्यानंतर सुद्धा हीच प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे पाल्य शाळेत व घरी पोहोचल्याची माहिती पालकांना ॲपवर मिळेल. जीपीएसमुळे ऑटो चालकांचे लाईव्ह लोकेशन पालकांना कळेल. तो इतर ठिकाणी गेल्याचे सुद्धा पालकांना समजेल.

अखिलेश गणवीर : सकाळ वृत्तसेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.