'या' तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये जन्मजात दोष असतात; काय सांगते अंकशास्त्र?

कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी अंकशास्त्र खूप उपयुक्त ठरू शकते.
Numerology
Numerology
Updated on

कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी अंकशास्त्र खूप उपयुक्त ठरू शकते. एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्याचे गुण-दोष निश्चित केले जाऊ शकतात. व्यक्तीचा मूलांक जन्मतारखेपासून ओळखला जातो आणि त्यावरून त्या व्यक्तीबद्दल जाणून घेता येते, असे मानले जाते. अंकशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल तर त्याचे मूलांक 2 असते.

तारखेची संख्या एकत्र जोडल्यास मूलांक सापडतो. आज आपण जाणून घेणार आहोत की, मूलांक 2 हा चंद्र ग्रहाशी संबंधित असतो. मूलांक 2 असलेले लोक भावनिक असतात. याशिवाय ते निर्णय घेण्यातही घाई करतात. मूलांक 2 असलेल्या लोकांच्या कमतरता आणि ते समृद्ध कसे होऊ शकतात याबद्दल जाणून घेऊया.

Numerology
Astro Tips : वैवाहिक जीवनात मंगळसूत्र घालण्याची 'ही' पद्धत ठरू शकते चुकीची

2 मुलांक असलेल्या लोकांमध्ये कोणत्या कमतरता असतात?

मूलांक 2 असलेल्या लोकांना इतरांचे ऐकणे आवडत नाही. सर्वत्र स्वतःहून धावण्याचा प्रयत्न करतात. हा मूलांक असलेल लोक नेहमीच घाईत असतात. शिवाय कोणताही निर्णय घेण्यासाठी त्यांची घाई असते. त्यामुळे त्यांना अनेकवेळा त्रास सहन करावा लागतो. मूलांक 2 असलेल्या लोकांमध्येही निरंकुशता दिसून येते. जन्मजात अशा लोकांमध्ये कमतरता असते. यामुळे ते अनेकदा अडचणीत येतात. जर अशा एखाद्या व्यक्तीला या समस्या टाळायच्या असतील तर इतरांचे मत ऐकण्याची सवय लावायला हवी आणि त्यांनी निर्णय घेण्याची घाई करू नये.

मूलांक 2 असलेल्यांनी भगवान शंकराची पूजा करावी

मूलांक 2 असलेल्या लोकांनी भगवान शिवाची पूजा करावी. भगवान भोलेनाथ सर्व दुःख दूर करेल आणि आशीर्वाद देतील. याशिवाय प्रदोष आणि पौर्णिमेचे व्रत ठेवावे. यामुळे सुख-समृद्धी मिळेल. याशिवाय आर्थिक लाभही होईल. या राशीच्या लोकांसाठी सोमवार हा शुभ दिवस आहे.

Numerology
Astro Tips : संपत्ती वाढवण्यासाठी दालचिनीच्या 'या' चमत्कारिक युक्त्या येतील कामी..

हे रंग मूलांक 2 साठी शुभ आहेत

मानवी जीवनात रंगांना खूप महत्व आहे. अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी पांढरा रंग शुभ आहे. याशिवाय मूलांक 2 असलेल्या लोकांना केशरी रंगही शुभ वार्ता देतो. मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी जांभळा, निळा आणि काळा रंग अशुभ असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांनी यापासून दूर रहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.