Gatari Amavasya 2024 : गटारी अमावस्या बनवा घरच्यांसाठी स्पेशल, सुक्क्या मटणापेक्षा बनवा होममेड मटण चॉप्स, चव जिभेवर रेंगाळेल

काही घरातील लोक हॉटेलला जाणे पसंत करतात. तर, काहीजण चिकन,मटण माशांचे अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतात.
Gatari Amavasya 2024
Gatari Amavasya 2024esakal
Updated on

Gatari Amavasya 2024 :

आज गटारी अमावस्या आहे. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे आज रात्री लोक गटारी अमावस्या साजरी करतात. या दिवशी घरोघरी मटाणाचे बेत आखले जातात.

काही घरातील लोक हॉटेलला जाणे पसंत करतात. तर, काहीजण चिकन,मटण माशांचे अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतात. तुम्हीही मटाणाचं सुक्क, अन् रस्सा खाऊन कंटाळला असाल. तर, तुम्ही मटण चॉप्स ट्राय करा.

Gatari Amavasya 2024
Raan Mutton : अस्सल मटण.. रान मटण! एकदा खाल तर बोटं चाखत रहाल

घरच्या घरी मटण चॉप्स कसे बनवायचे याची सोप्पी रेसिपी पाहूयात.

साहित्य -

१ किलो मटण चॉप्स, पाऊण वाटी तेल, अर्धी वाटी दही, १ टे स्पून धणे, जिरे पावडर, १ छोटा चमचा हळद, २ टी स्पून लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा किलो कांदे पातळ लांब कापून, पाव किलो टोमॅटो बारीक चिरून, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, १ गड्डी लसूण, २ इंच आलं एकत्र बारीक वाटून.

Gatari Amavasya 2024
Mutton Biryani Recipe : भातात मटण घालून शिजवणे म्हणजे बिर्याणी नव्हे, योग्य पद्धतीने बनवा धुळवड स्पेशल मटण बिर्याणी

कृती :

  • मटण चॉप्स धुवून साफ करून ठेवावेत. मोठ्या कढईमध्ये तेल गरम करून पातळ उभे चिरलेले कांदे गुलाबी रंगावर परतून घ्यावेत.

  • कांदा परतला गेला की वाटलेले मिरची, आलं, लसूण, धणे, जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला व हळद घालून मसाला खमंग वास सुटून तेल बाजूला होईपर्यंत परतावा.

  • थोडे थोडे दही घालून मसाला परतावा, असे दही संपेपर्यंत करावे. मसाल्यात दही एकजीव झाले की टोमॅटो घालून परतावे. टोमॅटो परतले गेले की मटण चॉप्स् घालावे.

  • मटण चॉप्स् घालून परतताना मसाल्याला थोडे पाणी सुटेल, ते पाणी सुकेपर्यंत चॉप्स् लाल रंगाचे होईपर्यंत परतावे.

  • एक भांडंभर पाणी घालून चवीनुसार मीठ घालून सर्व चॉप्स् प्रेशरकुकरमध्ये घालावेत. प्रेशर कुकर गॅसवर ठेवून पूर्ण प्रेशरवर आल्यावर गॅस बारीक करून दहा मिनिटे शिजू द्यावे व गॅस बंद करावा. प्रेशरकुकर थंड झाल्यावर उघडावा व आतील चॉप्स रसासकट परत कढईत काढावेत.

  • कढई मोठ्या गॅसवर ठेवून सतत ढवळत, असलेला रस पूर्णपणे सुकवावा. मसाला चॉप्सच्या सर्व बाजूंनी लागला पाहिजे. तेल बाजूला सुटेपर्यंत चॉप्स खमंग परतून मग उतरवावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.