रुग्ण, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना नेहमी मटणाचे सूप (mutton soup beneficial) पिण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टरही रुग्णांच्या नातेवाइकांना हे सांगत असतात. यामुळे जखम लवकर बरी होत. तसेच आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होते, असे सांगितले जाते. कारण, पाया सूपमध्ये सोडिअम, पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने, ‘अ’ जीवनसत्व, ‘क’ जीवनसत्व, कॅल्शिअम, लोह असे अनेक पोषक घटक असतात. पाया सूपचे सेवन केल्याने विविध प्रकारचे आरोग्यविषयक फायदे (Health benefits) मिळू शकतात. शरीराच्या वाढीसाठी आणि आवश्यक पोषक घटक मिळण्यासाठी पाया सूप पिणे फायद्याचे ठरते. चला तर जाणून घेऊयात पाया सूप पिण्याचे फायदे... (mutton bone soup)
पाया सूपमध्ये खनिजे, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, फ्लोराइड, सोडिअम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते. पाय सूपमध्ये जिलेटिन हा घटक असतो जो पोषक तत्वांचे पचन करण्यास मदत करतो. त्यामुळे गॅस किंवा बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या असतील तर आहारासोबत पाया सूप घेऊ घ्या. पाया सूपचे सेवन गर्भवतीही करू शकतात. पाया सूप प्यायल्याने गर्भाच्या योग्य विकासास मदत मिळते. पाया सूपमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे मुबलक प्रमाण असते जे बाळाच्या विकासास मदत करते.
इतर आहाराच्या तुलनेत पाया सूपचे (mutton soup beneficial) सेवन कमी प्रमाणात केले तरीही पुरेसे पोषण मिळते. पाया सूपमुळे भूक शांत होते. पाया सूप प्यायल्याने सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी सारख्या समस्यापासून आराम मिळतो. रात्रीचे जेवण करताना पाया सुपचा आहारात समावेश केला तर चांगली झोप लागते. पाया सूप तयार करण्यासाठी प्राण्यांची हाडे आणि संयोजी ऊतकांचा वापर केला जातो. हेल्दी ड्रिंक म्हणून तुम्ही पाय सूप पिऊ शकता. पाय सूप शेळी, टर्की, कोकरू, हरण (बायसन), कोंबडी किंवा मासे आदी कोणत्याही प्राण्याच्या हाडांपासून तयार केले जाते. याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे (Health benefits) होतात.
हे आहेत फायदे
नियमितपणे पाया सूपचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
पाया सूप हे अधिक पोषक घटक व कमी कॅलरीयुक्त अन्न आहे.
याचे सेवन केल्याने अनावश्यक वजन कमी होण्यास मदत होते.
पाया सूप पिल्यामुळे पोट भरते.
वारंवार भूक लागत नाही.
पायासूप शरीरातील पाण्याची कमतरता भागवते.
यातून फायबर घटक ही मिळतात.
पाया सूपमुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.
पाया सूपचे सेवन केल्याने त्वचेला आणि केसांना फायदा होतो.
पायासूपमध्ये असणाऱ्या कॅल्शिअम घटकामुळे नखे व केस अधिक मजबूत होतात.
वजन कमी करण्यासाठी प्रभावी
हाडांपासून (mutton) तयार केलेल्या या सूपमध्ये कॅलरी सामग्री खूपच कमी असते. तसेच भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पाय सूपचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते. याशिवाय पाय सूपमध्ये (mutton soup beneficial) जिलेटिन आढळते, जे तुम्हाला दीर्घकाळ पोटभर ठेवण्यास मदत करते. तसेच यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास वजन कमी करता येते.
जळजळ कमी करते
न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, पाय सूप प्यायल्याने सूज कमी होऊ शकते. हाडांमध्ये असलेल्या अमीनो ॲसिड जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या सूपमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे तुम्हाला सर्दीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.
अमीनो ॲसिड भरपूर
पाय सूपमध्ये अमीनो ॲसिड भरपूर असते. अन्नपदार्थांमध्ये अमीनो ॲसिडची उपस्थिती रोग प्रतिकारशक्ती वाढवते. या पोषक तत्वांचे सेवन करून अनेक आजारांवर मात करता येते. पाया सूपच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात.
हायड्रेटेड राहण्यास होते मदत
पाया सूप प्यायल्याने शरीराला इलेक्ट्रोलाइट्स आणि कार्बोहायड्रेट्ससारखे घटक मिळतात. शरीरातील पाण्याच्या कमतरतेवर इलेक्ट्रोलाइट्समुळे मात करता येते. सूपमध्ये कॉफीचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे शरीराला पोषक द्रव्ये तर मिळतातच शिवाय पाण्याची कमतरताही दूर होते.
चांगली झोप
शरीरात अमिनो ॲसिडचा पुरवठा होऊन झोप सुधारते. २०१५ च्या न्यूरोसायकोफार्माकोलॉजीने केलेल्या अभ्यासातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार पाया सूपचे नियमित सेवन केल्यास निद्रानाशाच्या समस्येवर मात करता येते. तुम्ही निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असाल तर आहारात याचा समावेश करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.