श्रावण म्हणजे सण,उत्सवांचा महिना असं म्हटलं जातं. श्रावणमासातील पहिला सण नागपंचमी येत्या १३ तारखेला म्हणजेच शुक्रवारी साजरा करण्यात येणार आहे. नागपंचमीला विशेष महत्त्व असून अनेक ठिकाणी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तसंच या सणामागे अनेक अख्यायिकादेखील आहेत. नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केली जाते व त्याला नैवेद्य दाखवला जातो. तसंच अनेक ठिकाणी नागाला दूधदेखील पाजलं जातं. मात्र, नागाला किंवा सापाला दूध पाजू नये असं वारंवार वनविभागाकडून सांगण्यात येतं. इतकंच नाही तर याविषयी जनजागृतीदेखील केली जाते. परंतु, अनेकदा धार्मिकतेचं कारण देत नागाला दूध पाजलं जातं. म्हणूनच, नागाला किंवा सापाला दूध का पाजू नये यामागचं वैज्ञानिक कारण कोणतं ते जाणून घेऊयात. (nagpanchami 2021 before offering milk to snake get the scientific and religious insight)
विज्ञान काय सांगत?
पर्यावरणाचा तोल राखण्यासाठीदेखील सापांचं रक्षण करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दूध हे सापाचं अन्न नाही. सापाचं मुख्य खाद्य उंदीर, बेडूक आहेत. तसंच साप कधीच दूध पित नाही. नागाला बळजबरीने दूध पाजणं त्याच्यासाठी अपायकारक आहे. अनेकदा साप दूध पितो असं खोटं सांगून बळजबरीने त्याला दूध पाजलं जातं. मात्र, त्यामुळे सापांचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे सापाला कधीही दूध पाजू नये.
दरम्यान, नागपंचमीच्या दिवशी अनेक गोष्टींचं पालन केलं जातं. यात चिरु नये, कापू नये, तवा ठेऊ नये किंवा तळू नये अशा गोष्टींचं पालन करावं लागतं. विशेष म्हणजे या दिवशी सापाला दूध पाजण्याऐवजी त्याची शास्त्रोक्त पूजा करावी. तसंच त्याच्या प्रतिमेपुढे किंवा मुर्तीपुढे दूध, लाह्यांचा नैवेद्य दाखवावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.