Nag Panchami 2023 : नागाबद्दल या गोष्टी सांगितल्या जातात, पण त्या खऱ्या आहेत का?

नाग कोणाच्याही शरीरात प्रवेश करू शकतात
Nag Panchami 2023
Nag Panchami 2023esakal
Updated on

Nag Panchami 2023 :श्रावण महिन्याला आजपासून सुरूवात झालीय. श्रावणातील पहिलाच सण आता नागपंचमी तोंडावर आली आहे. नागपंचमीबद्दल घरातल्या आजीसोबत कधी बोललात तर ती सांगेल, खरी नागपंचमी कशाला म्हणतात. उंच झोक्याची स्पर्धा, लाह्या अन् कण्यांच्या भरलेल्या पाट्या म्हणजे नागपंचमी.

खेडोपाडी आजही नागपंचमीला झोका उंच घालवण्याची स्पर्धा भरते. पण शहरात केवळ नागोबांच्या प्रतिमा पुजन एवढाच उत्साह राहिला आहे. नागपंचमीला देवता म्हणून आपण देवांची पूजा करतो. लहानपणापासूनच आपण नाग, सापांबद्दल काही गोष्टी ऐकत आलोय. जेव्हा कधी साप हा विषय चर्चेत येतो तेव्हा त्याच्याशी संबंधित या गोष्टीही कानावर पडतात.  (Nag Panchami 2023)

Nag Panchami 2023
सांगली - महिलांनी झिम्मा-फुगडी खेळत साजरी केली नागपंचमी

साप दूध पितो का

हिंदू धर्मामध्ये सापांना दुध पाजण्याची प्रथा आहे, जी पूर्णपणे चुकीची आहे. जीव विज्ञानुसार, साप पूर्णपणे मांसाहारी जीव आहे. बेडूक, उंदीर, पक्ष्यांची अंडी व इतर छोटे-छोटे जीव खाउन साप पोट भरतात. दुध यांचा नैसर्गिक आहार नाही.

नागलोक खरच अस्तित्वात आहे का?

भुलोक अर्थात पृथ्वी आहे तसेच नाग लोकही आहे आणि तिथे नाग-नागिन मनुष्यरूपात वास करतात, असे सांगितले जाते.

नाग रूप बदलू शकतात ?

जगात इच्छाधारी नाग आहेत आणि ते रूप बदलू शकतात. नाग, सापांकडे मणी असतो, ते त्याचे रक्षण करत असतात. नाग कोणाच्याही शरीरात प्रवेश करू शकतात

Nag Panchami 2023
नागपंचमी निमित्त वारुळाचे पूजन, झोक्याचा आनंद पहा फोटो

सापांना मिशी येते

वयाची १०० पार केली की नागांना दाढी, मिशा येतात. अन् त्यांना उडण्याची शक्ती प्राप्त होते. असे एक मिथक आहे. पण यात काही तथ्य नाहीय. मिशी असणारे साप नसतातच. ही एखाद्या गारुड्याची शक्कल आहे. सापाला एखादे खास स्वरूप दिल्यानंतर चांगली कमाई होऊ शकते. यामुळे गारुडी घोड्याच्या शेपटीचे केस काढून सापाच्या तोंडावर कुशलतेने शिउन टाकतात. 

नाग बदला घेतो

नाग-नागिनीच्या जोडीला धक्का लागला तर त्यातील एक नाग दुसऱ्या नागाचा बदला घेतो. असे अनेक बॉलिवूड चित्रपटातही दाखवले गेले आहे. कदाचित लोकांनी घाबरून सापाला मारू नये म्हणून असे पसरवले गेले असेल. (Snake)

नाग स्वत:चं बिळ बनवत नाही

जगात कोणालाही स्वत:जवळ ओढण्याची शक्ती अजगराच्या नाकात असते. नाग स्वत: बिळ न बनवता तो उंदरांच्या बिळात राहतो. नाग जमिनित गाढलेल्या धनाची रक्षा करत असतो. त्याला नाग चौकी असे म्हणतात

नाग मनुष्याला संमोहीत करतो

नाग मनुष्याला संमोहीत करू शकतात, तर तो नाग गाणे ऐकून मग्न होतात. नागांची भांडणं आणि जोडीचे प्रणय काल पाहणे पाप मानले जाते.

Nag Panchami 2023
Nag Panchami 2023 : यंदा नागपंचमी कधी आहे ? जाणून घेऊ या पूजेचे महत्व शुभमुहूर्त आणि पूजा विधी

या गोष्टी खऱ्या की खोट्या हे कोणालाही माहिती नाही. पण, जे लोक नागदेवतेची पूजा करतात त्यांना या गोष्टींवर विश्वास आहे. अगदी देवाधिकांच्या काळातही नागदेवता मनुष्यरूपात होते, अशा अनेक पौराणिक कथाही प्रसिद्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.