Nag Panchami 2023 : सर्पदंश झाल्यास नागदेवाची कृपा असलेल्या या गावात जा, विषापासून मिळेल मुक्ती!

साप पाळणाऱ्या गावाबद्दल तूम्ही ऐकलंय का?
Nag Panchami 2023
Nag Panchami 2023esakal
Updated on

Nag Panchami 2023 : साप आलाय एवढं जरी ऐकलं तरी अनेकांची भांबेरी उडते. सापाच्या दंशाने माणसाचा मृत्यूही होतो. त्यामुळेच लोक सापापासून चार हात लांबच असतात. पण, तरीही कधी कुठल्या शेताच्या बांधावर, रस्त्यावर, गाडी चालवतानाही सापाची गाठ पडतेच.

सापाने केलेला दंशावर काही प्राथमिक गोष्टी आहेत.जसं की साप चावला असेल तर धावत न येता आहे त्या जागी थांबावे. साप चावला असेल तिथून वर दोरीने घट्ट बांधावे. यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावेत. पण या सगळ्यात वेळ झाला तर माणसाला जीव गमवावा लागतो. (Nag Panchami Special Snake bite or going to the Temple gives life)

साप चालव्याच्या घटना रोज घडतात. काहीवेळा तर सर्पमित्रांनाही सर्पदंश झाल्याच्या घटना आहेत. त्याचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. उद्या नागपंचमी आहे. त्यानिमित्तानेच आपण देशातील अशा काही हटके गावांबद्दल माहिती घेणार आहोत. जिथे साप पाळले जातात. तर, कुठे गावात प्रवेश करताच सापाचे विष छुमंतर होते.

Nag Panchami 2023
Nagpanchami 2022: भारतातील 4 प्रसिद्ध सर्प मंदिरे कोणती ?

छत्तीसगड - दिघारी गावाची वेश

भारतात असं एक गाव आहे जिथे साप आणि माणूस अगदी आनंदात राहतो. इथे साप जसे घरात पाळलेला एखादा प्राणीच मानला जातो. त्याप्रमाणेच सापाला वागणूक दिली जाते. हे आहे छत्तीसगडची राजधानी रायपूरजवळील दिघारी गाव. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावाबाहेर एखाद्याला साप चावला आणि तो गावात आला तर त्याचे विष निघून जाते.

यामागील पौराणिक कथा

एकदा गावातील एका ब्राह्मणाने एका सापाचा जीव वाचवला होता.त्यानंतर सापाने या गावाला वरदान दिले की, या गावात राहणाऱ्या लोकांना कधीही साप चावणार नाही. साप चावलेला माणूस दुसऱ्या ठिकाणाहून या गावात आला तर सापाच्या कृपेने विषाचा प्रभाव संपून त्याचा जीव वाचतो. 

Nag Panchami 2023
Shirala Nagpanchami : बत्तीस शिराळ्यातील प्रसिद्ध नागपंचमी बघायची आहे? मग, तिथं जाण्यापूर्वी ही बातमी आधी वाचा..

बिहार – सोनवर्षा गाव

बिहारमध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत. लाखो भाविक तिथल्या प्राचिन मंदिरांना भेट देतात. बिहारमधीलच भागलपूरमधील सोनवर्षा गावात असे एक अनोखे मंदिर आहे, जिथे प्रसादाला ठेवलेला नीर पिऊनही सापाचे विष निकामी होते.

सर्पदंश झालेले अनेक लोक येथे येतात आणि मंदिरात येऊन त्या लोकांना जीवनदान मिळते. नागपंचमीच्या निमित्ताने येथे दरवर्षी भव्य जत्रा भरते, ज्यामध्ये दूरदूरवरून लोक येतात. (Nag Panchami 2023)

Nag Panchami 2023
Nag Panchami 2023 : नागपंचमी स्पेशल - हळदीच्या पानातील पातोळ्याची रेसिपी VIDEO, जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदेही

साप पाळणारं गाव

महाराष्ट्रातील या गावाचे नाव शेतपाळ असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे पुरातन काळापासून सापांची पूजा केली जाते. त्यामुळेच गावातील प्रत्येक घरात सापांना खूप महत्त्व आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाला सापांची खूप आवड आहे, त्यामुळे येथे साप पाळले जातात.

शेतपालमध्ये सध्या प्रत्येक घरात साप पाळण्यात आले आहेत. इतकंच नाही तर काही घरांमध्ये अतिविषारी नागही पाळले जातात आणि हे सर्व साप घरात उपस्थित असलेल्या मुलांसोबत खेळतानाही दिसतात. गावात पाळीव प्राण्यांप्रमाणे साप फिरत असतात. अनेक लोक मोठ्या कुतूहलाने या अनोख्या गावाला भेट देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.