Nag Panchami 2024 : कुंडलीत फणा काढून बसलेला कालसर्प दोष काय आहे? नागपंचमी दिवशी करा हे उपाय, त्रासातून मुक्त व्हाल!

What Is Kalsarpa Dosh :कालसर्प दोष काय आहे आणि त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेऊयात.
Kalsarpadosh ke upay
Kalsarpadosh ke upay esakal
Updated on

Nag Panchami 2024 :  

आपल्या जीवनात अनेक अडथळे येत असतात. त्यातून काही लोक बाहेर पडतात तर काही लोक अधिकच गुरफटतात. आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे हे प्रसंग आपल्या कुंडलीमुळे येऊ शकतात. होय, तुम्ही कालसर्प दोषाबद्दल ऐकलं असेल. तर हा दोष आपल्या जीवनात आल्याने आपल्यावर वाईट आणि चांगला असेल दोन्ही परिणाम होतात. कालसर्प दोष असेल.

आपल्या कुंडलित अनेक शुभ आणि अशुभ योग येत असतात. कुंडलीतील शुभ योग आपल्याला इच्छित फळ देतात. तर कुंडलीतील अशुभ योग आपल्याला अनेक मोठ्या संकटात नेऊन टाकतात. कुंडलीमध्ये असे अनेक योग आहेत ज्याला वाईट म्हटलं जातं. त्यापैकीच एक आहे कालसर्प दोष. हा दोष काय आहे आणि त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेऊयात. (Nag Panchami 2024)

Kalsarpadosh ke upay
Nag Panchami 2023 : नागाच्या या मंदिरांना भेट द्याल तर कालसर्प दोषातून होईल सुटका, नशिबही पालटेल

कुंडलिक कालसर्पदोष आहे कसे ओळखावे?

कुंडलित कालसर्प दोष असलेला व्यक्ती शारीरिक आणि आर्थिक दृष्टीने नेहमी असंतुष्ट असतो. काही लोकांना या दोषामुळे संतती प्राप्ती होत नाही. तर काही लोकांची मुलं नेहमी आजारी असू शकतात.  

कालसर्प दोष असेल तर नोकरीतही अडथळे येतात.  असा व्यक्ती एका जागेवर नोकरीला टिकू शकत नाही. त्यामुळे तुमच्या कोणीतरी कालसर्प दोष असेल तर त्याचे उपाय लवकरात लवकर करून घ्या.  

Kalsarpadosh ke upay
Nag Panchami 2023 : प्रयागराजमधील नागवासुकी मंदिरातील दगड प्रसाद म्हणून घरी का नेतात?

 

कालसर्पदोषाचे ज्योतिष शास्त्रात सांगितलेले उपाय

ज्योतिष शास्त्रात कालसर्प दोषातून अनेक उपाय सांगितले गेले आहेत. जर कालसर्प दोषांमुळे पती-पत्नी सतत वाद होत असतील तर घरातील देव्हाऱ्यात भगवात श्रीकृष्णांच्या मूर्तीची पूजा केली पाहिजे.

फक्त एक लक्षात घ्या की या मूर्तीवरती मोरपंख असलेला मुकुट परिधान केलेला असावा. श्रीकृष्णांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते. ते लोभस आहेत ते सगळ्यांना वेड लावणारे आहेत त्यामुळे त्यांच्या घरात असलेल्या सहवासाने घरातील वाद नाहीसे होतात.

Kalsarpadosh ke upay
Nag Panchami: नागपंचमीला 'या' गोष्टी करणे मानले जाते अशुभ

ज्या व्यक्तीच्या कुंडलित कालसर्प दोष आहे त्यांनी भगवंत श्रीकृष्णांचे पूजा केली पाहिजे. तसेच ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ किंवा ‘ओम नमो वासुदेवाय कृष्णाय नमः’ या मंत्राचा जप केला पाहिजे.

महामृत्युंजय मंत्राचा सतत जाप केल्याने सुद्धा कालसर्पदोषातून मुक्ती मिळते. तुम्ही वेळ काढून सकाळी किंवा सायंकाळी देवासमोर बसून हा मंत्र म्हणू शकता. किंवा इतवेळी महत्त्वाच्या कामातही तुम्ही सतत या मंत्राचा जप करू शकता.

Kalsarpadosh ke upay
Nag Panchami 2023 : नागपंचमीच्या दिवशी महादेवाला या गोष्टी अर्पण करा, मिळेल दुप्पट लाभ

जर कालसर्प दोषामुळे नोकरीत अडथळे येत असतील. एखादा व्यक्ती एका जागी टिकू शकत नसेल. तर गुलमोहराच्या फुलाचा उपाय करा. गुलमोहराचे फुल देशी गायीच्या गोमूत्रामध्ये बुडवून ते सुकवून घ्या. सुकल्यानंतर त्याचे बारीक पावडर करून घ्या. चंदनाच्या पावडरीत गुलमोहराचे चूर्ण मिसळून शिवलिंगावरती त्रिपुंडी आकार बनवा. 21 दिवस पर्यंत हा उपाय केल्याने नोकरीतील अडथळे दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.