Nag Panchami 2024 : ऐका नागोबा देवा तुमची कहाणी...; नागपंचमीची पौराणिक कथा वाचा, दिवस चांगला जाईल

Nag Panchami Story : नागदेवतेची पौराणिक कथा काय आहे जाणून घेऊयात
Nag Panchami 2024
Nag Panchami 2024esakal
Updated on

Nag Panchami 2024 : श्रावण महिन्याती पवित्र असा नागपंचमीचा सण आज आहे. नागपंचमीच्या सणाला नागदेवतेची पूजा केली जाते. नागांना नैवेद्य दाखवून मैत्रिणींसोबत खेळ खेळले जातात. नागोबाच्या मंदिरात झाडाला झोके बांधून उंच झोक्यांची स्पर्धाही आयोजित केली जाते. महिलांचा हा आवडता सण आहे.

जसे प्रत्येक सणामागे एक चांगला हेतू असतो. तसा नागपंचमीचाही आहे. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. त्याची कथाही वाचली जाते. नागदेवतेची पौराणिक कथा काय आहे जाणून घेऊयात.

Nag Panchami 2024
Nag Panchami 2024 : भारतात या ठिकाणी आहे नागलोकाचे प्रवेशद्वार, रहस्यमयी ठिकाणी आजही आहे हजारो सापांचे अस्तित्व

ऐका नागोबा देवा, तुमणी कहाणी, आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पांच सात सुना होत्या. चातुर्मासांत श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत.

सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनांत माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली, इतक्यांत काय झालं?  शेषभगावानास तिची करूणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला.

ब्राह्मण विचारांत पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आतांच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंहि हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ताकीद दिली की, हिला कोणी चावू नका!

Nag Panchami 2024
Nag Panchami: नागपंचमीला पूजा करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, नागदेवता होतील प्रसन्न

एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊं लागली. तेव्हां हिला हातांत दिवा धरायला सांगितला, पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करूं लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली.

एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशानं तुटली ? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घावा म्हणून ते हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस, हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहींत, म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला.

Nag Panchami 2024
Nag Panchami: नागपंचमीला पूजा करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, नागदेवता होतील प्रसन्न

हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनांतील सर्व राग घालविला. मनांत हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दुध, पाणी ठेवतात त्यांत पहांटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले.

दुसऱ्या दिवशीं तिने हार उचलून गळ्यांत घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवों. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.