Nag Panchami 2024 : भाऊबीज अन् रक्षाबंधनाला नाही तर महिला नागपंचमीला का करतात भावासाठी उपवास?

Nag Panchami 2024 : नागाला भाऊ मानून नागाची पूजाही केली जाते. म्हणून या दिवशी उपवास केला जातो.
Nag Panchami Fast
Nag Panchami Fast esakal
Updated on

Nag Panchami 2024 :

श्रावण महिन्याच्या सुरुवातीला नागपंचमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश बंगाल या ठिकाणी या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी खरोखर जे नागांची पूजा करू शकत नाहीत. ते लोक नागांची प्रतिकृती घरोघरी आणून त्याची पूजा करतात. नागाला शेतकऱ्याचा भाऊ म्हटलं जातं तर प्रत्येक महिलेचा बंधू म्हटले जाते. पण असं का हे फार लोकांना माहिती नाही.

नागपंचमी दिवशी अनेक उत्सव साजरे केले जातात. या दिवशी महिला घराजवळील नागोबाच्या मंदिरात नैवेद्य घेऊन जातात. तिथेच उंच झोक्यावरती झोके घेतात. मैत्रिणींच्या मेळ्यात रमतात आणि आनंदी होतात. वृद्ध महिला सांगतात की, चिरमुरे लाह्या देवाला व्हायला जायच्या. त्याचबरोबर त्या मैत्रिणींच्या मेळ्यातही फस्त व्हायच्या.

Nag Panchami Fast
Gold Silver Price Today: नागपंचमी निमित्त सोन्या-चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचा भाव

रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन्ही दिवशी आपल्या लाडक्या भावाला औक्षण करून त्याला ओवाळलं जातं. पण त्यादिवशी उपवास केला जात नाही. मग नागपंचमी दिवशी भावासाठी उपवास का करावा असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. त्याचाच उत्तर आपण जाणून घेऊया.

नागपंचमीला भावाचा उपवास का केला जातो?

पौराणिक कथा अशी आहे की, खूप वर्षांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक देवी होती. तिच्या भावाचे नाव सत्तेश्वर असे होते. या सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता. भावाच्या विरहात बुडालेल्या सत्तेश्वरी देवीला एका नागाच्या रूपात तिच्या भावाचे दर्शन झाले.

सत्तेश्वरीने नागाची पूजा करून त्यालाच आपला भाऊ मानले. देवीवर प्रसन्न झालेल्या त्या नागदेवतेने भावाप्रमाणेच अखंड तिची रक्षा करण्याचे वचन दिले. तेव्हापासून प्रत्येक बहिण नागासाठी उपवास करू लागली.

Nag Panchami Fast
Nag Panchami 2024 : कुंडलीत फणा काढून बसलेला कालसर्प दोष काय आहे? नागपंचमी दिवशी करा हे उपाय, त्रासातून मुक्त व्हाल!

पुढे ही प्रथा पडली. नागाला भाऊ मानून नागाची पूजाही केली जाते. भावाचा उपवास करून दुसऱ्या दिवशी नागाची पूजा केली जाते. आणि पूजा केल्यानंतर मातीच्या नागांचे विसर्जन केले जाते.

महाराष्ट्रात या दिवशी उपवास केला जातो. काही महिला उपवासाचे पदार्थ खातात. कर काही ठिकाणी दही-धपाटेही या उपवासाला खाल्ले जातात. अखंड दिवस उपवास करून सायंकाळी गोडाधोडाने हा उपवास सोडला जातो. तर, दुसऱ्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. उपवासादिवशी मातीच्या नागोबाच्या गळ्यात हळदीने पिवळा केलेला दोरा घातला जातो. तोच धागा घरातील महिलांच्याही गळ्यात बांधला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.