Nag Panchami 2024 : शेतकरी वर्ग नागदेवतेकडे पिकांच्या रक्षणासाठी नागपंचमीच्या दिवशी प्रार्थना करतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी होते. विष्णूच्या शेषनागापासून शिवाच्या गळ्यातील नागपर्यंत अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये नागांचा उल्लेख आढळतो. परंपरा आणि रीतीरिवाजप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते.
नाग हे पर्यावरणातील जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक आहेत. म्हणूनच नागदेवतेची पूजा ही केवळ परंपरा नसून, निसर्गातील महत्त्वाच्या प्राण्यांचे संरक्षण करण्याचा एक प्रयत्न आहे. विषारी सापांमध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे यांचा. समावेश आहे. जे मानवास वेळत व योग्य उपचार न मिळाल्यास घातक ठरू शकतात.
ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना कमी करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जनजागृती करणे महत्त्वाचे ठरू शकते. वनविभाग, सामाजिक तसेच वन्यजीव संस्था व स्थानिकांच्या सहभागातून जनजागृती करणे शक्य आहे.