Nag Panchami 2024: नागपंचमीनिमित्त जुन्या पैठणमधील नागघाटावरील नागेश्वर शेषमूर्तीची महापूजा व अभिषेक शुक्रवारी (ता. ९) पहाटे पुरोहित जितेंद्र कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चारात करण्यात येत आहे. शेकडो वर्षांपासून नागपंचमीच्या पर्वावर हजारो भक्तगण दर्शनासाठी येतात. सूर्यास्तासमयी नागघाट परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
नागघाटावर प्राचीनकाळी नागेश्वर नावाचा नाग राहात असे, तो नाग लोकांमध्ये वावरत असे. या शेषराजापासून शालीवाहन नावाचा पराक्रमी राजा जन्माला आला, अशी आख्यायिका सांगितली जाते. नागघाटावरील सायंकाळी भरलेल्या छोटेखानी यात्रेत लहान मुलांची आवडती खेळणी, साहित्य खरेदी करण्यासाठी पैठणकरांची गर्दी होते.