Nail polish hacks: नखावर लवकर नेलपॉलिश वाळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या

नेलपॉलिशमुळे महिला आणि मुलींच्या स्टाइलला खास लुक मिळतो.
Nail polish
Nail polishsakal
Updated on

नेलपॉलिशमुळे महिला आणि मुलींच्या स्टाइलला खास लुक मिळतो. नेलपॉलिशकडे आता फॅशन स्टाइल म्हणून पाहिले जाते. मुली वेगवेगळ्या प्रकारच्या नेलपॉलिशने नखं सजवतात. सणसमारंभ असो किंवा अगदी रोज ऑफिस, कॉलेजला जाताना नेलपॉलिश लावणं असो, पण त्याविषयी एक वेगळं आकर्षण महिलांमध्ये नक्कीच जाणंवतं.

अगदी दोन मिनीटांत नेलपॉलिश नखांवर लावली जात असली तरी ती सुकणं हा मोठा वेळखाऊ भाग असतो. जर चुकून ओल्या नेलपॉलिशवर काही लागलं किंवा तो हात कशावर लागला तर सगळी मेहनत पाण्यात जाते आणि नेलपॉलिश खराब होते. या त्रासापासून वाचण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

Nail polish
Beauty Tips For Women : तरुण दिसायचंय?मग 'हा' उपाय करून बघाच

टिप्स

वॅसलिनचा वापर करा

नेलपॉलिश लावण्यापूर्वी नखाभोवती व्हॅसलीन लावा. यामुळे नेलपॉलिश बोटांना चिकटणार नाही.

नेल पॉलिशचा वापर रिमूव्हर म्हणून करा

रिमूव्हर नसेल तर जुन्या नेलपॉलिशवर ताज्या नेलपॉलिशचा कोट लावून लगेच पुसून टाका. यामुळे जुनी नेलपॉलिशची शेड निघून जाईल.

थंड पाण्याची जादू

नेलपॉलिश सुकवायला वेळ नसेल तर लावल्यानंतर थंड पाण्यात बोटे बुडवा. यामुळे ते पटकन सुकून जाईल.

ब्लो ड्रायचा वापर

कोल्ड सेटिंगवर ब्लो ड्रायर चालवून तुम्ही तुमचे नेलपॉलिश वेगाने सुकवू शकता.

Nail polish
General knowledge: ब्रिटनमधले तरुण का खातात चहासोबत समोसा?

फॉयलचा वापर

घरी जेल मॅनिक्युअर काढण्यासाठी, रिमूव्हरमध्ये भिजवलेले कापसाचे गोळे नखांवर लावा आणि फॉइलने झाकून अर्धा तास सोडून द्या.

निलगिरीच्या तेलाची जादू

तुमची आवडती नेलपॉलिश सुकली असेल तर त्यात निलगिरीच्या आवश्यक तेलाचे काही थेंब टाका. म्हणजे ते पुन्हा वापरता येईल.

गरम पाण्याची कमाल

नेलपॉलिशचे झाकण उघडत नाही का? एक कप गरम पाण्यात नेलपॉलिशची बॉटल काही वेळ तशीच ठेवा. ती काही काळाने उघडेल.

नीट स्टोअर करा

आवडत्या नेलपॉलिशची शेड जास्त काळ वापरण्यासाठी फ्रीजमध्ये तशीच ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()