Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीला सुर्योदयापूर्वीच अभ्यंगस्नान करणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या पौराणिक कथा

लक्ष्मीपूजन आधी येणाऱ्या नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात.
Narak Chaturdashi 2024
Narak Chaturdashi 2024 esakal
Updated on

Narak Chaturdashi 2024 :

लक्ष्मीपूजन आधी येणाऱ्या नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी दिवे लावण्याची परंपरा अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला असे याचे महत्त्व आहे.

या दिवसाची एक पौराणिक कथाही आहे. त्यामध्ये नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. दिवाळी आधी हा सण का साजरा केला जातो. याचे काय महत्त्व आहे, याबद्दल जाणून घेऊयात. (Narak Chaturdashi 2024)

Narak Chaturdashi 2024
Diwali Vacation Tourism : दिवाळीत फिरायला जायचा प्लॅन आहे? महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं आहेत अप्रतिम

दिवाळीचा दुसरा दिवस नरकचतुर्दशी या नांवाने प्रसिद्ध आहे. पुराणात अशी कथा आहे की, पूर्वकाली भौमासूर किंवा नरकासूर नांवाचा एक बलाढ्य असुर प्राग्ज्योतिषपुर येथे राज्य करीत होता. त्याने इंद्राचे छत्र, अदितीची कुंडले व अमरपर्वतावरील मणिपर्व नांवाचे स्थान हरण केले.

देव व मानवांना ते त्रास देऊ लागला. आपण अजिक्य व्हावे म्हणून त्याने आपल्या राजधानीच्या सभोवती पर्वतांचे व शस्त्रांचे कोट रचले. हा दुष्ट दैत्य स्त्रियांस पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना आपल्या तुरुंगात कोंडून ठेविले व त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला.

Narak Chaturdashi 2024
Diwali Vacation Tourism : हनिमून डेस्टिनेशन ते निसर्ग सौंदर्य...; दिवाळीत 'या' सुंदर ठिकाणांना जरुर भेट द्या

अशी स्थिती प्राप्त होताच जिकडे तिकडे हाहाकार उडाला. श्रीकृष्णाला ही बातमी समजताच त्याने बरोबर सत्यभामेस घेऊन त्या असुराच्या गडावर हल्ला केला. नरकासुरास ठार करून सर्व राजकन्यांची मुक्तता केली व नरकासुराने देव इंद्र आणि इतरांपासून हरण केलेले धन ज्यांचे त्यांस परत दिले.

चतुर्दशीच्या दिवशी उपःकालाच्या सुमारास नरकासुरास ठार करून व त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळास लावून घरी येताच नंदाने श्री कृष्णांना मंगल स्नान घातले.

स्त्रियांनी दिवे ओंवाळून आनंद व्यक्त केला. सर्व नगरी आनंदोत्सवात सामील झाली. या युद्धाचे स्मारक म्हणून नरकचतुर्दशीचा दिवस दिवाळीतील मुख्य दिवस बनला आहे.

असे म्हटले जाते की, नरकासुराने श्री कृष्णांकडे वर मागितला की, ज्या दिवशी माझा मृत्यू झाला. तो दिवस साजरा व्हावा. दिव्यांनी घर अंगण सजवून हा दिवस साजरा व्हावा. अशी इच्छा या राक्षसाने श्री कृष्णांकडे व्यक्त केली. तसेच, आजच्या दिवशी जो कोणी सुर्योदयापूर्वी स्नान करेल तो स्वर्गात जाईल, त्याच्या नशिबातील नरक यातना दूर होतील, असेही या नरकासुराने देवांकडे मागितले.

त्यावर तथास्तू म्हणत श्रीकृष्णांनी नरकासुराला हा वर दिला. त्यादिवसापासून पहाटे सुर्योदयापूर्वीच अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.

Narak Chaturdashi 2024
Diwali Soan Papdi: दिवाळीला गिफ्ट म्हणून सर्वांच्या घरी फिरणारी 'सोनपापडी' आली तरी कुठून? जाणून घ्या या मिठाईचा इतिहास

(प्रस्तूत कथा लेखक ऋग्वेदी यांच्या 'आर्यांच्या सणांचा प्राचीव न अर्वाचीन इतिहास'यातून घेण्यात आली आहे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.