National Cancer Awareness Day 2023: आज आहे 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस'; जाणून घ्या यामागील लक्षण आणि उपचार

भारतात 7 नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन' साजरा केला जातो. या दिवशी कर्करोगासारख्या धोकादायक आजाराबद्दल जनजागृती केली जाते.
National Cancer Awareness Day
National Cancer Awareness Daysakal
Updated on

भारतात दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा केला जातो. हा दिवस महत्त्वाचा आहे कारण तो लोकांना कर्करोगाच्या गंभीर धोक्याबद्दल शिक्षित करतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात घातक आजार आहे ज्यामुळे लोकांचा मृत्यू होतो. कर्करोगाने मरणाऱ्या लोकांची स्थिती भारतासाठी गंभीर धोका आहे.

'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन' हा दिवस सर्वप्रथम 2014 मध्ये साजरा करण्यात येईल असे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जाहीर केले होते. त्यानुसार दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन' देशभर साजरा करण्यात येतो.

या दिवसाचा इतिहास काय आहे?

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सर्वप्रथम सप्टेंबर 2014 मध्ये राष्ट्रीय कर्करोग जागृती दिनाची घोषणा केली. जीवघेण्या या आजाराला वेळीच पकडण्याची गरज ओळखून त्यांनी या दिवसाची सुरुवात केली. या दिवशी सरकारी रुग्णालये आणि महापालिकेच्या दवाखान्यात लोकांना मोफत तपासणी केली जाते. कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे आणि ते कसे टाळता येईल याविषयी माहिती देणारी पुस्तिकाही वितरित करण्यात आली.

National Cancer Awareness Day
Mouth Cancer : स्वतःच ओळखा मुखाच्या कॅन्सरची पहिली पायरी

कर्करोगाची लक्षणे-

- सतत अतिसार

- सतत खोकला आणि तोंडातून रक्त येणे

- अशक्तपणा

- स्तनातील गाठ

- यूरिनमध्ये बदल

 कर्करोगावर काय उपचार केले जाऊ शकतात?

  • अनेक प्रकारचे कर्करोगासाठी उपचार आहेत. हे उपचार व्यक्तीच्या शरीरात कर्करोग किती पसरला आहे आणि तो कोणत्या टप्प्यात आहे यावर अवलंबून आहे.

  • कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपी, हार्मोन थेरपी, इम्युनोथेरपी, रेडिएशन थेरपी इत्यादी उपचार पर्याय केले जातात.

  • रुग्णाच्या आरोग्यावर आणि त्याच्या कौटुंबिक इतिहासावर कर्करोगाच्या उपचाराची पद्धत अवलंबून असते.

  • जर कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आला तर तो अगदी सहज बरा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.