National Doctor's Day 2024: पहिल्यादा डॉक्टर्स डे कधी अन् का साजरा करण्यात आला, वाचा एका क्लिकवर

National Doctor's Day 2024:भारतात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. डॉक्टरांची सेवाभावना, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो.
National Doctor's Day 2024:
National Doctor's Day 2024:Sakal
Updated on

National Doctor's Day 2024: भारतात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. डॉक्टरांची सेवाभावना, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. पण पहिला डॉक्टर्स डे कधी साजरा करण्यात आला होता हे जाणून घेऊया.

1 जुलैलाच का साजरा केला जातो?

दरवर्षी १ जुलैला डॉक्टर्स डे साजरा केला जातो. कारण महान वैद्य डॉ.बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस १ जुलै १८८२ रोजी होता. एवढेच नाही तर 1 जुलै 1962 रोजी डॉ.बिधान यांचे निधन झाले. या कारणास्तव त्यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक डॉक्टरचा सन्मान करण्यासाठी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉक्टर दिन १९९१ साली साजरा करण्यास सुरुवात झाली. यावर्षी केंद्र सरकारने प्रथमच डॉक्टर्स डे साजरा केला. डॉक्टरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यांचे नाव होते डॉ.बिधानचंद्र रॉय.

डॉ. बिधान चंद्र कोण होते?

डॉ. बिधान चंद्र राय हे बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. ते एक वैद्य देखील होते, ज्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान होते. जाधवपूर टीबी वैद्यकीय संस्थेच्या स्थापनेत डॉ.बिधानचंद्र रॉय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय उपखंडातील पहिले वैद्यकीय सल्लागार म्हणून ते प्रसिद्ध झाले. 4 फेब्रुवारी 1961 रोजी डॉ.बिधानचंद्र रॉय यांनाही भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. मानवतेच्या सेवेतील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाची दखल घेण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.