National Doctor's Day 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढतेय मेडिकल टुरिझम, तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक सुविधा, स्वस्त उपचारामुळे प्राधान्य

National Doctor's Day 2024: तज्ज्ञ डॉक्टर, रुग्णालय, अत्याधुनिक सुविधा, स्वस्त उपचार मिळत असल्याने रुग्ण शहरात विशेषतः अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, कर्करोग, बायपास, किडनी विकार सारख्या गंभीर आजाराच्या चाचण्या व उपचारासाठी प्राधान्य देत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
National Doctor's Day 2024:
National Doctor's Day 2024: Sakal
Updated on

National Doctor's Day 2024: मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात मेडिकल टुरिझम वाढत आहे. तज्ज्ञ डॉक्टर, रुग्णालय, अत्याधुनिक सुविधा, स्वस्त उपचार मिळत असल्याने रुग्ण शहरात विशेषतः अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, कर्करोग, बायपास, किडनी विकार सारख्या गंभीर आजाराच्या चाचण्या व उपचारासाठी प्राधान्य देत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

वर्ष १९५६ मध्ये शहरात मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी शहर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातदेखील मोठे रुग्णालय नव्हते. अगदी एमडी डॉक्टरसुद्धा कुठे उपलब्ध नसायचे. यामुळे घाटी रुग्णालयाकडे उपचारासाठी रुग्णांचा ओघ असायचा. आजदेखील बाह्य रुग्ण विभागात रोज दोन हजार रुग्ण उपचार घेतात. हळूहळू खासगी रुग्णालयांचेही जाळे वाढले. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर्स सुपर स्पेशलिटीही शहरात उपलब्ध झाल्या. यात गंभीर आजारासाठी सुपर स्पेशलिटीसह तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने त्याचबरोबर अत्याधुनिक सुविधा, कमी खर्चात उपचार होत असल्याने बाहेर शहर, मराठवाडा आणि इतर जिल्ह्यातूनसुद्धा रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत.

अशा आहेत सुविधा

सद्यःस्थितीत शहरात कार्डियोलॉजी (हृदयरोग), युरोलॉजी (मूत्रविकार), युरो सर्जरी (मूत्रशल्यचिकित्सा), न्यूरोलॉजी (मज्जातंतू), न्यूरोसर्जरी (मज्जातंतू शल्यचिकित्सा), निओनॅटॉलॉजी (नवजात शिशू। आणि प्लास्टिक सर्जरी अशा सुपर स्पेशालिटी सारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.

कर्करोग रुग्णालयात परराज्यातून रुग्ण

बारा वर्षांपूर्वी शहरात सुरू झालेले शासकीय कर्करोग रुग्णालय हे रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. येथे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, नाशिक, जळगाव, नगर, मुंबई, पुणे येथून रुग्ण उपचारासाठी येतात. यासह मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल येथून येणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी साऊथ आफ्रिका व यमन येथील रुग्णांनी देखील येथे उपचार घेतले आहेत.

National Doctor's Day 2024:
National Doctor's Day 2024: डॉक्टरांना खास संदेश पाठवून द्या अनोख्या शुभेच्छा

उपचार, राहण्यासाठी स्वस्तात सुविधा

उपचाराचा विचार केला तर शहरात दीड ते दोन लाखांमध्ये अँजिओप्लास्टी होते. मुंबईमध्ये याचा खर्च दोन ते सहा लाखांपर्यंत जातो. बायपास शस्त्रक्रिया शहरात अडीच ते तीन लाखात होते. येथे मुंबईत पाच ते दहा लाखांपर्यंतचा खर्च येतो. यासह मुंबईसारख्या शहरात राहण्याचे आणि जेवणाचा खर्चही अधिक आहे. या तुलनेत छत्रपती संभाजीनगर मध्ये राहण्याचा आणि जेवणाच्या सुविधा देखील स्वस्तात उपलब्ध आहेत.

अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णालय, तज्ज्ञ डॉक्टर, अत्यल्प दरात उपचार अशा सुविधा शहरात मिळत असल्याने बाहेरील रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात. यात कर्करोग, हृदयरोग, किडनी विकार यासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

- डॉ. तुकाराम औटे, हृदयविकार तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.