National Egg Day 2024: नाश्ता हेल्दी आणि पटकन होईल असा हवा, तर मग अंड्यापासून बनवा पराठा अन् गोड हलवा

अंडी प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचाही चांगला स्रोत आहेत
National Egg Day 2024
National Egg Day 2024esakal
Updated on

National Egg Day :

जर तुम्हाला काही हेल्दी आणि चविष्ट खायचे असेल तर तुम्ही अंडी खाऊ शकता. कारण, अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.डॉक्टरही अंडी रोज खाण्याचा सल्ला देतात. पण नाश्त्यासाठी रोज वेगळी रेसिपी शोधणे कठीण असते. त्यामुळे आज राष्ट्रीय अंडी दिनादिवशी आपण अंड्याचा पराठा आणि अंड्याचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत.

अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. याशिवाय अंडी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचाही चांगला स्रोत आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन बी देखील अंड्यांमध्ये आढळतात. अंडी मुलांच्या विकासात मदत करतात. अंड्यांचे तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ बनवून खाऊ शकता.

जर तुम्हाला अंडी खायला आवडत असतील तर तुम्ही अंड्याचा पराठा देखील खाऊ शकता. बनवायला खूप सोपं आहे, बाहेर विकत मिळणारा अंड्याचा पराठा तुम्ही घरी बनवू शकता. आज राष्ट्रीय अंडी दिन आहे,त्यानिमित्ताने जाणून घ्या अंडा पराठ्याची रेसिपी. (Egg healthy recipe)

National Egg Day 2024
Priyanka Chopra: 'आईने दिला होता Eggs Freeze करण्याचा सल्ला, त्यामुळं आयुष्य आणि करिअर दोन्ही बदललं', अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अंडा पराठा

साहित्य :

४ अंडी, एक कांदा बारीक चिरून, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, दीड वाटी कणीक, १ टे. स्पून तेल, पराठे तळण्याकरता तेल अथवा तूप, चवीनुसार मीठ.

कृती :

दीड वाटी कणीक १ टे. स्पून तेलाचे मोहन व मीठ घालून पराठ्याकरता घट्ट भिजवावी.

अंडी फोडून फेटून घ्यावीत. त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घालून फेटून घ्यावे. कणकेचे चार सारखे भाग करावे व त्यातील एका भागाचा पराठा लाटावा.

National Egg Day 2024
Diabetes and Egg: अंडी खाल्ल्याने डायबिटीजचा धोका वाढतो का? जाणून घ्या याबाबतचं सत्य

फ्राईंगपॅन गॅसवर ठेवावे. गरम झाले की लाटलेला पराठा त्यावर टाकावा, पराठा खालच्या बाजूने थोडा शेकला गेला की उलटावा व कडेने एक टे. स्पून तूप सोडावे. फेटलेल्या अंड्याचा पाव भाग पराठ्यावर सारखा पसरावा व लगेच उलटवावा. खालच्या बाजूने अंडे ऑम्लेटसारखे पराठ्यावर सेट होईल.

अंडे सेट झाले की, उलटून दुसऱ्या बाजूने पराठा शेकवून घ्यावा. असे सर्व पराठे करून घ्यावेत. टोमॅटो सॉसबरोबर गरम गरम सर्व्ह करावे.

National Egg Day 2024
Egg Dosa: नाश्त्यात बनवा चविष्ट अंड्याचा डोसा, नोट करा रेसिपी

अंड्याचा हलवा

अंड्यापासून बिस्कीट वैगरे गोड पदार्थ बनवले जातात. पण अंड्यापासून बनलेला शिरा, हलवा कधी पाहिलाय का? नाही ना, मग आज आपण राष्ट्रीय अंडी दिन साजरा करतोय. त्यानिमित्ताने आपण अंड्याचा गोड पदार्थ कसा बनवायचा हे पाहुयात.

साहीत्य

अंडी, पाऊणवाटी साखर, २ चमचे साजूक तूप, २ चमचे व्हॅनिला इसेन्स

कृती:

अंडी फोडून घ्यावीत. फ्राईंगपॅन किंवा छोट्या कढईत तूप गरम करावे व त्यावर फेटलेली अंडी घालावीत. चमच्याने सतत ढवळावे अंडी घट्ट झाली की त्यात पाऊणवाटी साखर, दोन थेंब व्हॅनिला घालावे. झाकण ठेवून एक वाफ द्यावी. शिऱ्याप्रमाणे साखर विरघळली की उतरवावे.

फेटलेले अंडे तुपात एकदम न घालता गाळण्यावर धरून गाळून घातले तर बुंदीच्या कळ्याप्रमाणे दाणे तुपावर पडतात. त्यात साखर घालून त्याचा हलवा बनवावा.

(संबंधित रेसिपी या जयश्री देशपांडे यांच्या 'हमखास पाककृती' या पुस्तकातून घेण्यात आल्या आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.