National Ice Cream Day 2024: जांभूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. जांभूळमध्ये अनेक पोषक घटक असतात. यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. यंदा २१ जुलैला आइस्क्रीम दिन साजरा केला जात आहे. यादिनानिमित्त मधुमेही देखील जांभुळापासून आइस्क्रीम बनवू शकता.
जांभूळचे आइस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य
जांभूळ
नारळाचे दूध
कॉर्न फ्लोअर
साखर
जांभूळचे आइस्क्रीम कसे बनवावे
जांभूळपासून आइस्क्रीम बनवण्यासाठी दुधामध्ये कॉर्नफ्लोअर मिक्स करावे आणि नंतर बाजूला ठेवावे. उरलेले दूध मध्यम आचेवर उकळवा. आता दुधात कॉर्नफ्लोअर मिक्स घालून नीट ढवळून घ्यावे. गॅस बंद करून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात जांभळाचा गर आणि शुगर फ्री साखर किंवा स्टीव्हिया पावडर घाला. नंतर एका खोलगट डब्यात ठेवा आणि फॉइल पेपरने झाकून ठेवा. किमान 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवा. नंतर हे मिश्रण पुन्हा मिक्स करा. आता डब्यात थोडे आइस्क्रीम ठेवा, नंतर जांभूळचे काही तुकडे घाला आणि आता परत थोडे आइस्क्रीम ठेवा. आता सेट होण्यासाठी ठेवा आणि सेट झाल्यावर सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.