National Ice Cream Day 2024 : देशातील कोणते शहर 'आईसक्रीम सिटी' म्हणून ओळखले जाते?

National Ice Cream Day 2024 : दरवर्षी जुलै महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 'राष्ट्रीय आईसक्रीम दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
National Ice Cream Day 2024
National Ice Cream Day 2024esakal
Updated on

National Ice Cream Day 2024 : आईसक्रीम खायला तर आपल्या सगळ्यांनाच प्रचंड आवडते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आईसक्रीमचा मनसोक्त आस्वाद घेतात. आजकाल तर या आईसक्रीमची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, आईसक्रीमचे विविध प्रकारचे फ्लेवर्स उपलब्ध झाले आहेत.

आईसक्रीमप्रती लोकांचे हे प्रेम आणि आईसक्रीमची लोकप्रियता पाहूनच दरवर्षी जुलै महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 'राष्ट्रीय आईसक्रीम दिन' साजरा केला जातो. यंदा हा आईसक्रीम दिन २२ जुलै (रविवार) ला साजरा केला जात आहे. आज या आईसक्रीम दिनानिमित्त आपण देशातील एका अशा शहराबद्दल जाणून घेणार आहोत. जे ‘आईसक्रीम सिटी’ म्हणून ओळखले जाते. कोणते आहे ते शहर ?चला तर मग जाणून घेऊयात.

National Ice Cream Day 2024
Tamatar Chaat Recipe: नीता अंबानींनी खाल्लेली वाराणसीची प्रसिद्ध टोमॅटो चाट घरीच बनवा, लगेच ही सोपी रेसिपी नोट करा

शहरांना वेगळी नावे का दिली जातात?

आपला भारत देश हा विविधतेने नटला आहे. विविध राज्यांच्या खाद्यसंस्कृती, राहणीमान आणि कपड्यांमध्ये देखील वैविध्य आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे, प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या शहरांची देखील स्वत:ची अशी खास वैशिष्ट्ये आहेत.

यामध्ये तेथील कपडे, खाद्यपदार्थ इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे, ही शहरे देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे, या शहरांना जागतिक ओळख देण्यासाठी तेथील स्थानिक परंतु, तिथल्या प्रसिद्ध गोष्टींशी जोडून त्यांना टोपणनावे दिली जातात.

Ice Cream City म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

आपल्या देशात एक असे आगळेवेगळे शहर आहे, जे खास आईसक्रीम सिटी म्हणून ओळखले जाते. कर्नाटक राज्यात विविध शहरांचा समावेश आहे. या राज्यातील मंगळुरू हे शहर ‘आईसक्रीम सिटी’ म्हणून देशभरात ओळखले जाते. या शहरातील वाढत्या डेअरी उत्पादनामुळेच मंगळुरू हे शहर आईसक्रीम हब बनले आहे. त्यामुळेच, या शहराला आईसक्रीम सिटी म्हणून देशभरात ओळखले जाते.

शहरातील आईसक्रीम पार्लरची संख्या

मंगळुरू शहरातील रस्ते हे आईसक्रीम पार्लरने गच्च भरले आहेत. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या आईसक्रीम फ्लेवर्सची चव चाखायला मिळेल. दरम्यान, या शहरात सर्वात मोठे आईसक्रीम पार्लर देखील आहे. ज्या ठिकाणी एकाचवेळी ३०० लोक बसून आईसक्रीमचा आस्वाद घेऊ शकतात.

या शहरातील सर्वात प्रसिद्ध आईसक्रीम कोणते?

मंगळुरू या शहरातील सर्वात प्रसिद्ध आईसक्रीमबद्दल बोलायचे झाल्यास, ते ‘गडबड आईसक्रीम’ आहे. या गडबड आईसक्रीमचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक पोहचतात. तुम्ही जर कधी या शहराला भेट दिली तर या आईसक्रीमचा नक्कीच आस्वाद घ्या.

National Ice Cream Day 2024
Guru Purnima 2024: गुरूपौर्णिमा का साजरी केली जाते? वाचा त्यामागील 'ही' पौराणिक कथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.