National Junk Food Day 2024 : जंक फूडपासून होणाऱ्या दुष्परिणाम कसे ठेवाल दूर, वाचा एका क्लिकवर

how to avoid junk foods side effects: तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरतात.
National Junk Food Day
National Junk Food Day sakal
Updated on

how to avoid junk foods side effects: देशभरात दरवर्षी राष्ट्रीय जंक फूड २१ जुलैला साजरा केला जातो. जंक फूडमध्ये बर्गर, रोल आणि पिझ्झा यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. आजकाल देशात आणि जगात जंक फूड खूप लोकप्रिय झाले आहे. धावपळीत पोट भरण्यासाठी जंक फूड खाण्यावर लोकांचा भर अधिक असतो. पण याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. पण यापासून बचाव कसा कराव हे जाणून घेऊया.

जंक फूड शब्दाची उत्पत्ती कशी झाली

जंक फूड हा शब्द 1951 मध्ये निर्माण झाला. त्याची पहिली अधिकृत व्याख्या 1972 साली दिसून आली. ही व्याख्या अमेरिकन पोषण शास्त्रज्ञ मायकेल एफ. जेकबसन यांनी दिली होती. जंक फूड हा शब्द वापरण्याचा उद्देश लोकांचे लक्ष जास्त कॅलरी आणि कमी पोषक असलेल्या पदार्थांकडे वेधणे हा होता.

तज्ज्ञांचे मत

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जंक फूड, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ असल्याने लोकांच्या आरोग्यावर अनेक प्रकारे दुष्परिणा होतो. जंक फूडमध्ये भरपूर कॅलरीज, मीठ, साखर आणि फॅट असते. यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, बद्धकोष्ठता आणि मधुमेह आजाराचा समावेश होतो. त्यामुळे या पदार्थांचे सेवन मर्यादित करावे.

व्यायाम करावा

जे लोक जंक फूड खाणे टाळतात त्यांना असे वाटते की जास्त कॅलरी आणि जास्त चरबी खाल्ल्याने त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचते. त्यामुळे जर तुम्ही जंक फूड किंवा चीज, मेयोनीज, स्पेशल चटण्या, सोडा इत्यादी फास्ट फूड खात असाल तर त्यासोबत फळे, सॅलड्स, भाज्या, कडधान्य यासारख्या पदार्थांचे सेवनही करावे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही आणि संतुलन राखले जाईल. याशिवाय व्यायाम, योगासने आणि धावणे किंवा चालणेही चालू ठेवावे.

National Junk Food Day
National Ice Cream Day 2024: मधुमेही घेऊ शकतात आइस्क्रीमचा आस्वाद, असे बनवा घरीच जांभूळ आइस्क्रीम

जंक फूड खाण्याचे तोटे

जंक किंवा फास्ट फूड खाल्ल्याने अनेक प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. याच्या अनियंत्रित सेवनामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढू शकतो. जंक फूड खाल्ल्याने श्वसनसंस्थेवरही परिणाम होतो. त्यामुळे दमा, धाप लागणे अशा समस्या उद्भवू शकतात. जंक फूड खाल्ल्याने त्वचा, केस आणि नखांवरही परिणाम होतो. शरीरावर इसब, खाज आणि टाळूच्या समस्या दिसू शकतात. जंक फूडचा पचन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालींवरही परिणाम होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com