National Lipstick Day 2024: पावसाळ्यात कोणत्या रंगाचे लिपस्टिक शेड वापरावे?

National Lipstick Day 2024: पावसाळ्यात ओलावा आणि आद्रतेमुळे चेहार निस्तेज दिसतो. पण या वातावरणात चेहऱ्याचा लूक वाढवण्यासाठी कोणत्या रंगाची लिपस्टिक वापरावी हे जाणून घेऊया.
National Lipstick Day 2024
National Lipstick Day 2024Sakal
Updated on

Use these Lipstick Shades in monsoon: दरवर्षी २९ जुलै हा दिवस राष्ट्रीय लिपस्टिक दिवस म्हणून साजरा केला जातो. अनेक महिला चेहऱ्याचे सौंदर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी लिपस्टिक वापरतात. पण पावसाळ्यात योग्य रंगाचा शेड न वापरल्यास तुमचा लुक खराब होऊ शकतो. कारण पावसाळ्यात आद्रता जास्त असल्याने चेहरा निर्जीव दिसतो. राष्ट्रीय लिपस्टिक दिवसानिमित्त जाणून घेऊया कोणत्या पावसाळ्यात शेड्सचा वापर करावा.

पावसाळ्यात पुढील शेडच्या लिपस्टिकचा वापर करू शकता

फ्युशिया पिंक

पावसाळ्यात कोणत्याही कार्यक्रमांमध्ये जाण्यासाठी आपण कपडे, दागिने यासारख्या अनेक गोष्टींवर भर देतो. तसेच मेकअप करताना देखील लक्ष दिले पाहिजे. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. यामध्ये लिपस्टिकचा शेड खुप महत्वाचा असतो. तुम्ही पिंक शेडचा वापर करू शकता. हा शेड खास करून अभिनेत्री जास्त वापरतात.

पीच शेड

लिपस्टिकचा पीच शेड अनेकांचा आवडता आहे. तुम्ही पावसाळ्यात या शेडची लिपस्टिक वापरू शकता. हा शेड लावून पावसाळ्यात कोणत्या कार्यक्रमात गेलात तर सर्वाच्या नजरा तुमच्यवरच राहतील.

National Lipstick Day 2024
National Lipstick Day 2024: चाळीशीनंतर अन् त्यापुर्वी लिपस्टिकचा रंग कसा निवडावा, वाचा एका क्लिकवर

ब्राऊन शेड

तुम्ही पावसाळ्यात ब्राऊन शेडची लिपस्टिक लावू शकता. या शेडमुळे महिलांच्या सौंदर्यात अधिक भर पडते. तुम्ही ऑफिसमध्ये हा शेड वापरू शकता.

प्लम शेड

पावसाळ्यात हा शेड ऑफिस आणि कार्यक्रमात जाण्यासाठी वापरू शकता. हा रंग सर्व प्रकारच्या आउटफिट्समध्ये चांगला दिसतो. कोणत्याही पार्टी फंक्शनमध्ये तुम्ही ते कॅरी करू शकता. तसेच तुमच्या चेहऱ्याचे देखील सौंदर्य वाढवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.