National Lipstick Day 2024: अनेक महिला चेहऱ्याचे सौंदर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी लिपस्टिकचा वापर करतात. प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये लिपस्टिक असतेच. तसेच कोणत्या रंगाची लिपस्टिक वापरावी हे देखील महत्वाचे आहे. कारण योग्य रंगाची लिपस्टिक तुमचा लूक अधिक आकर्षक बनवतो. दरवर्षी २९ जुलै हा दिवस राष्ट्रीय लिपस्टिक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त जाणून घेऊया की चाळीशीनंतर आणि आधी कोणत्या रंगाच्या लिपस्टिक वापरल्या पाहिजे.
महिलांनी वयाच्या चाळीशीनंतर तरूण दिसण्यासाठी लिपस्टिकचा योग्य रंग निवडणे गरजेचे आहे. जास्त डार्क मेकअप तुमचा लूक खराब करू शकतो. तसेच लिपस्टिकचा रंग निवडताना काळजी घ्यावी. या वयात महिला न्युड पिंक, रेड वाइन,ब्राऊन यासारखे रंग वापरू शकतात. यामुळे तुम्ही तरूण दिसाल. तसेच तुम्हाला लिपस्टिक लावायला आवडत नसेल तर लिप लायनरचा वापर करू शकता
अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी विविध रंगांच्या लिपस्टिक लावतात. पण कधी कधी अशा रंगाची निवड करतात ज्यामुळे त्या वेळेआधीच वयापेक्षा मोठ्या दिसतात. त्वचेच्या प्रकारानुसार लिपस्टिकचा रंग निवडल्यास तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलेल. तुम्ही रेड, चॉकलेटी, डार्क पिंक यासारख्या रंगाचा वापर करू शकता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.