National Mango Day 2024: चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा आंब्यापासून फेस पॅक

National Mango Day 2024: तुम्हाला चेहरा चमकदार हवा असेल तर आंब्यापासून घरीच फेस पॅख बनवू शकता. हा फेसपॅक कसा बनवावा हे जाणून घेऊया.
National Mango Day 2024:
National Mango Day 2024:Sakal
Updated on

National Mango Day 2024: आंबा अनेकांचा आवडते फळ आहे. तसेच आंबा भारताचे हे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याला परदेशीतही खुप मागणी आहे.भारताच्या राष्ट्रीय फळाचा सन्मान करण्यासाठी आणि जगभरातील लोकांना त्याच्या महत्वाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी २२ जुलै हा दिवस राष्ट्रीय आंबा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त आंब्यापासून फेसपॅक कसा बनवावा हे जाणून घेऊया.

फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे हवेतील प्रदुषणामुळे होणारी त्वचेची हानी होत नाही. तसेच त्वचा चमकदार बनते.

पिकलेला आंबा- १

दही - १ चमचा

मुलतानी माती- ३ चमचे

फेसपॅक बनवण्याची कृती

आंब्याचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी पिकलेला आंबा, दही आणि मुलतानी माती एकत्र करावे आणि चांगले मिक्स करावे. चेहरा स्वच्छ धुवावा आणि हा पॅक चेहऱ्यावर लावावा. १० ते २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

आंब्यामुळे त्वचा मुलायम होते. तसेच मुलतानी माती अतिरिक्त घाण स्वच्छ करते. चेहऱ्यावरचे मुरूम कमी करते आणि चेहरा चमकदार होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.