National Vanilla Ice Cream Day: घरीच बनवा व्हॅनिला आईस्क्रीम, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

National Vanilla Ice Cream Day: अनेक लोकांना आईस्क्रीम आवडते. पण त्यात देखील व्हॅनिला आईस्क्रीम अनेकांचा आवडता आहे. व्हॅनिला आईस्क्रीम डे निमित्त घरीच बनवा चवदार आईस्क्रीम.
National Vanilla Ice Cream Day
National Vanilla Ice Cream DaySakal
Updated on

Vanilla Ice Cream Day Recipe: जगभरात आईस्क्रीमचे प्रेमी खुप आहेत. उन्हाळ्यात सर्वच लोक मोठ्या आवडीने आईस्क्रीमचा आनंद घेतात. दरवर्षी २३ जुलैला व्हॅनिला आइस्क्रीम डे साजरा केला जातो. व्हॅनिला आइस्क्रीमचे नाव काढताच अनेकांच्या तोंडाला पाणी देखील येते. हा दिवस खास बनवण्यासाठी घरीच व्हॅनिला आइस्क्रीम बनवू शकता. यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

व्हॅनिला आइस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कस्टर्ड

फुल क्रीम दूध

साखर

व्हॅनिला इसेन्स

क्रीम

ड्रायफ्रुट्स

व्हॅनिला आइस्क्रीम बनवण्याची कृती

व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी कस्टर्डला दूध आणि साखरेत मिक्स करा. यानंतर उरलेल्या दुधात साखर घालून उकळावे. नंतर त्यात तयार कस्टर्ड घालून पुन्हा उकळा. नंतर थंड होण्यासाठी ठेवावे. नंतर व्हॅनिला इसेन्स आणि क्रीम घालून मिक्स करावे. डब्यात भरून फ्रिजरेटरमध्ये ठेवा. थोडं गोठल्यावर ते बाहेर काढा, हलकेच मिक्स करा आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवा. जर कंटेनर घट्ट बंद केला नाही तर त्यात गुठळ्या तयार होतील. शेवटी, दोन तास फ्रीज करण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. चेरी आणि सुकामेवा टाकून सजावट करा आणि सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.