Air Freshener At Home: बाजारातले महागडे रूम फ्रेशनर असतात विषारी... घरातच बनवा नॅचरल एअर फ्रेशनर

How to make natural air freshener At Home: एअर फ्रेशनर सहज मिळते परंतु सुगंध येण्यासाठी यामध्ये अनेक प्रकारचे रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते
How to make natural air freshener At Home
How to make natural air freshener At Homeesakal
Updated on

Ho to make Room Freshener : आपण आपलं घर फार प्रेमाने सजवतो. त्यात वेगवेगळे शोपिस ठेवतो. आपल्या आवडीचे रंग वापरतो. असे बरेच लोक असतील ज्यांचे घर ओलसर होते. ओलसर झाल्यानंतर घरात विचित्र वास येतो. या वासामुळे तुम्हीही घरात रुम फ्रेशनर वापरता का?  बाजारात मिळणारे रूम फ्रेशनर खूप महाग आहे.  

सध्या एअर फ्रेशनर (air freshener) चा वापर सगळीकडे करताना दिसत आहे. तसेच आपण देखील पाहुणे घरी येण्या आधी घराचा छान वास येण्यासाठी रूम फ्रेशनरचा वापर करतो. बाजारात अनेक प्रकारचे एअर फ्रेशनर स्प्रे सहज मिळतात.

पण त्यामध्ये केमिकलचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे आरोग्याला (Health) नुकसान पोहोचू शकते.  म्हणून आज आम्ही तुम्हाला नैसर्गिकरित्या घरात सुगंध येण्यासाठी सर्वोत्तम उपाय सांगणार आहोत काही मिनिटातच तुमच्या घरात (Home) सुगंध दरवळेल.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरच्या घरी सहज रुम फ्रेशनर बनवू शकता.  चला जाणून घेऊया रुम फ्रेशनर बनवण्याची सोपी पद्धत. (How to make room freshener at home)

फुलांच्या पाकळ्यांपासून बनवा (Room Freshener from Flowers)

फुलं की खूप नॅचरली सुगंध देणारी गोष्ट आहे. नॅचरल रूम फ्रेशनर बनवण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या वापरू शकतात. गुलाबाचा सुगंधही खूप छान असतो. यासाठी एका पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि त्यांना छान उकळवा. पाणी जरा वेळ उकळल की गॅस बंद करा आणि थंड व्हायला थोडा वेळ ठेवून द्या.

पाणी थंड झालं की ते गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि आपल्या रूम मध्ये स्प्रे करा. जर तुम्हाला गुलाब आवडत नसेल तर याच ठिकाणी तुम्ही दुसरे फुलं सुद्धा वापरू शकतात जसं की मोगरा, चाफा, पारिजातक किंवा चमेली.

How to make natural air freshener At Home
Home Cleaning Tips: घरातील Cobwebची चिंता दूर करायची आहे? मग या सोप्या ट्रीक्स नक्की वापरा

सुगंधी तेल वापरा

सुगंधी तेल खूप चांगले आहे. तुम्‍हाला हवं असेल त्‍याचा वापर तुम्ही रूम फ्रेशनर (ingredients for making air freshener) म्हणून करू शकतात. ते पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत टाका. त्याचा सुगंध खूप छान असतो.  स्प्रे बाटलीने आपल्या खोलीत त्याचा स्प्रे मारा. त्याचा सुगंध खूप छान असतो.

लवंग आणि दालचिनी

लवंग आणि दालचिनीचा सुगंध सुद्धा खूप छान असतो. गरम पाण्यात थोडी लवंगा आणि दालचिनी उकळवा. उकळल्यानंतर ते थंड करून स्प्रे बाटलीत ओतावे. त्याचा सुगंध खूप छान असतो.  आता तुम्ही घरात फवारणी करू शकता.

How to make natural air freshener At Home
Vastu Tips For New Home : फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी हे वास्तुदोष अवश्य तपासा

कॉफी रूम फ्रेशनर 

कांदा लसूण यासारख्या तिखट वासापासून सुटका मिळवण्यासाठी कॉफीचा वास देखील नैसर्गिक उपाय म्हणून काम करतो. कचऱ्याचा वास दूर करण्यासाठी कॉफी ग्राउंडला किचनच्या डस्टबिन मध्ये ठेवा. याने वास दूर होण्यास मदत होईल.

बेकिंग सोडा आणि दालचिनी रूम फ्रेशनर 

बेकिंग सोडा आणि दालचिनीचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारची दुर्गंधी दूर करू शकता. त्यासाठी बेकिंग सोडा आणि दालचिनी वापरून रूम फ्रेशनर तयार करून रोज घरात शिंपडावे लागेल.

बेकिंग सोडा आणि दालचिनी पाण्यामध्ये मिक्स करून तसेच तुम्ही दालचिनी आणि संत्रीचे पावडर पाण्यात मिसळून एका स्प्रेच्या बाटलित टाकून याचा वापर करू शकता.

How to make natural air freshener At Home
Home Tips : दूध उकळण्याच्या 'या' ट्रिक्स वापरा, भांडे खराब नाही होणार

एअर फ्रेशनर जेल 

तुम्हाला बाजारात एअर फ्रेशनर (air freshner) सहज मिळते परंतु सुगंध येण्यासाठी यामध्ये अनेक प्रकारचे रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

म्हणून घरच्या घरी एअर फ्रेशनर जेल बनवून वापरणे अधिक चांगले आहे. त्यासाठी जेलेटिन, चमेली, तुळशी, एसेन्शियल ऑईल मिसळून याचा वापर करा.

लिंबूवर्गीय फळांपासून रूम फ्रेशनर 

लिंबूवर्गीय फळांचा वापर करून रूम फ्रेशनर बनवू शकता.त्याने बाथरूम आणि स्वयंपाक घरातील दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल.

तुम्ही हे घरी सहज बनवू शकता त्यासाठी तुम्हाला वाइल्ड ऑरेंज एसेन्शियल ऑईल आणि लिंबू ची आवश्यकता आहे. या ऑईलचे चार-पाच थेंब पाण्यामध्ये मिसळून एका स्प्रेच्या बाटलीत टाकून पूर्ण घरांमध्ये शिंपडून घरातील दुर्गंधी निघून जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()