Navratri 2023 : देवीचे सहावे रूप म्हणून कात्यायनी देवीची आराधना केली जाते. देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे स्वरूप आहे. जिच्यामध्ये आसुराचा नाश करण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात.
वामन आणि स्कंद पुराणात त्यांच्या उत्पत्तीबद्दल किंवा स्वरूपाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. माता कात्यायनी हे दुर्गेचे सहावे रूप आहे. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की देवीच्या कात्यायनी रूपाचा जन्म परमेश्वराच्या नैसर्गिक कोपातून झाला होता.
वामन पुराणानुसार, देवीने कात्यायनी आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळणव्याची ताकद आपल्याला देते. सर्वस्वाशी एकरूप होण्याचे वरदानही देते. आईला कात्यायनी हे नाव कसे पडले याबद्दल एक कथा आहे. (Navratri 2023)
कात नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्याचा मुलगा कात्या ऋषी होता. या कात्याच्या कुळात जगप्रसिद्ध महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला. भगवती पारंबाची पूजा करताना त्यांनी अनेक वर्षे अत्यंत कठीण तपश्चर्या केली. त्यांच्या घरी आई भगवतीने कन्या म्हणून जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. माता भगवतीने त्यांची प्रार्थना स्वीकारली.
काही काळानंतर जेव्हा पृथ्वीवर महिषासुर राक्षसाचा अत्याचार वाढला तेव्हा भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपल्या शक्तीचा एक भाग देऊन महिषासुराचा नाश करण्यासाठी देवीची निर्मिती केली. महर्षी कात्यायन यांनी सर्वप्रथम त्यांची पूजा केली. या कारणास्तव तिला कात्यायनी म्हटले गेले.
महर्षी कात्यायन यांच्या कन्या म्हणून तिचा जन्म तेथे झाला अशीही एक कथा आहे. आश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेतल्यानंतर त्यांनी शुक्त सप्तमी, अष्टमी आणि नवमी असे तीन दिवस कात्यायन ऋषींची पूजा केली आणि दशमीला महिषासुराचा वध केला.
देवीचे रूप कसे आहे
देवी चार भुजा रुपी आहे. देवीच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळ पुष्प आहे. तर दुसऱ्या हातात अभयमुद्रा आणि वर मुद्रा केलेल्या रुपात आहेत. देवीचे शरीर सोन्यासारखे पिवळे आहे. तिचे वाहन सिंह आहे.
पूजा कशी करावी
सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवीची प्रतिमा पाटावर मांडून तिला लाल रंगाची चुनरी, पिवळ्या रंगाचे फुल, तीन पिवळी हळकुंडे अर्पण करावी. तिच्या पूजेत मधाचा वापर केलाच पाहिजे, कारण आईला मध खूप आवडतो. देवी कात्यायिनीला सुपारी देखील मधासह अर्पण केली जाते. कात्यायनी देवीच्या पूजेमध्ये लाल रंगाच्या कपड्यांनाही खूप महत्त्व आहे.
देवी कशाचे दान देते
कात्यायनी मातेची भक्ती आणि उपासनेने मनुष्याला धन, धर्म, आरोग्य आणि मोक्ष ही चार फळे सहज प्राप्त होतात. या जगात स्थित असूनही, तो अलौकिक तेज आणि प्रभावाने संपन्न होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.