Navratri 2023 : नवरात्रीचे नऊ दिवस सगळीकडे आनंदमय वातावरण असतं. नटून थटून महिला मंडळी गरब्यासाठी घराबाहेर पडतात. यावेळी आपण सगळ्यात सुंदर दिसावं अशी प्रत्येकीची अपेक्षा असते. तेव्हा नवरात्री सुरु होण्याआधीच महिलांनी तयारीला लागावे. चेहऱ्यावर नॅचरल ब्लश मिळवण्यासाठी तुम्ही महागडे प्रोडक्ट्स नाहीत तर नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता.
बीटरूट खाल्ल्याने आरोग्य सुधारते आणि ते चेहऱ्यावर लावल्याने रंगसुद्धा. जुन्या काळी, जेव्हा मेकअप प्रोडक्ट्स फार प्रचलित नव्हते तेव्हा गालावरच्या गुलाबी लालीसाठी बीटरूटचा वापर केला जाईल. बीटरूटचा ब्लशर बनवण्यासाठी तुम्हाला उकळलेल्या बीटरूटचा लगदा बनवा. त्यात ग्लिसरीनचे काही थेंब घाला. तुमचा नॅचरल ब्लशर घरीच तयार होईल.
गुलाबाच्या पाकळ्यांपासूनही ब्लशर बनवता येतं. गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून एका काचेच्या बाटलीत अरारोट पावडर मिसळून ठेवा. हा ब्लश ओलसर असेल.
वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून सुद्धा ब्लश बनवता येतो. त्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि अरारोट पावडर एकत्र करून चांगले बारीक करा. पावडर तयार झाल्यावर एका छोट्या काचेच्या बाटलीत ठेवा, तुम्ही ब्रशच्या मदतीने हे ब्लश लावू शकता.
तुम्हाला गालावर हलका पीच कलर हवा असेल तर नारंगी रंगाचे गाजर घ्या. हे गाजर किसून सुकवून घ्या.तुम्ही हा नॅचरल ब्लश कधीही लावू शकता.
जास्वंदाच्या फुलांपासून घरच्या घरी ब्लश देखील सहज बनवता येतो. यासाठी तुम्हाला जास्वंदाची फुले अरारोट पावडरसह मिक्स करून घ्या. सुगंधासाठी तुम्ही त्यात तुमच्या आवडीचे तेल घालू शकता. हे ब्लश तयार झाल्यावर काचेच्या छोट्या डब्यात भरा. घरी बनवलेले नैसर्गिक ब्लश रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा, जेणेकरून ते दीर्घकाळासाठी वापरता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.