Navratri 2023 : हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. अंबामातेचे भक्त या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. या उत्सवात नऊ दिवस दुर्गा मातेची पूजा केली जाते. देवीची खऱ्या मनाने पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते. तसेच भाविक नऊ दिवस उपवास करतात.
उपवासाच्या वेळी शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही पोट भरणारे बटाटे खाऊ शकता. बटाटा वापरून अनेक प्रकारच्या रेसिपी बनवता येतात. ज्या उपवासात शरीराला उत्साही ठेवण्यास फायदेशीर ठरतात. तसेच ज्या लोकांना नवं काही खायचं आहे त्यांच्यासाठीही या बेस्ट आहेत.
बटाट्याचा रायता
बटाटा हा उपवासात खाल्ला जाणारा एक लोकप्रिय पदार्थ आहे. उपवासात बटाट्याचा रायता खाऊ शकता. हे बनवायलाही खूप सोपे आहे. रायता बनवण्यासाठी, उकडलेले बटाटे मॅश करा, नंतर फेटलेल्या दह्यात बटाटे घाला. आता त्यात काळी मिरी, खडे मीठ मिसळा आणि हिरव्या कोथिंबीरीने सजवा.
बटाटा टिक्की
संध्याकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही स्वादिष्ट बटाट्याच्या टिक्की खाऊ शकता. हे करण्यासाठी, मॅश केलेल्या उकडलेल्या बटाट्यांमध्ये रॉक मीठ मिसळा, नंतर पॅन गरम करा आणि तेल घाला, आता टिक्की दोन्ही बाजूंनी फ्राय करा. हे तुम्ही चहासोबत खाऊ शकता.
बटाट्याचा शिरा
जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही बटाट्याचा शिरा देखील ट्राय करू शकता. हे बनवण्यासाठी उकडलेले बटाटे तुपात तळून त्यात दूध, साखर घालून हे मिश्रण चांगले मॅश करा. ते तयार झाल्यावर ड्रायफ्रुट्सने सजवा. (Recipe)
दही बटाटा
उपवासात जास्त तेलकट खायचे नसेल तर उकडलेल्या बटाट्यात दही मिसळा आणि त्यात खडे मीठ टाका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि भाजलेले जिरे पूड देखील वापरू शकता. स्वादिष्ट दही बटाटा तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.