Navratri 2023 : आई अंबाबाईच्या मंदिरातील खांब मोजताच येत नाहीत, हे खरंय का?

'खांब मोजता मोजता पंडित मेला' असं का म्हटलं जातं?
Navratri 2023
Navratri 2023 esakal
Updated on

Navratri 2023 : कोल्हापूर हे करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी हाऊसफुल झाले आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात इथे भक्तांची जत्राच भरते. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पीठांपैकी पूर्ण पीठ आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी आई अंबाबाईचे मंदिर आहे.

देवीचे मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे याची प्रचिती येतेच. पण, मंदिरातील खांबांबद्दल काही आख्यायिका आहेत. ज्या पूर्वापार बोलण्यात अन् ऐकण्यात येतात. असं म्हणतात की, अंबामातेच्या संपूर्ण मंदिरातील खांब मोजणे कधीच शक्य नाही.

केवळ त्याचा अंदाज लावला जाऊ शकतो, कारण जेव्हा कोणी हे खांब मोजण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला किंवा त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट घटीत झाले.

खांब मोजण्याबाबत वा.रा.धर्माधिकारी यांच्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी या पुस्तकातून माहिती घेतली तेव्हा काहीतरी वेगळंच सत्य समोर आले. ते काय याबद्दल माहिती घेऊयात.

Navratri 2023
Navratri Fashion : दांडियासाठी शेवटची रात्र, हेच दागिने घाला तुम्हीच सर्वात सुंदर दिसाल!

अंबाबाई मंदिराची रचना

अंबाबाईचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे.

अंबामातेचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असेही म्हटले जाते.

Navratri 2023
Kolhapur : 'आई अंबाबाई.. सगळ्यांना सुखी ठेव'; अमित शाहांची अंबाबाई चरणी प्रार्थना

देवीच्या गर्भागाराच्या बाहेर पितळेच्या पत्र्याने मढविलेला भव्य उबरा व मध्य गाभाऱ्याची नक्षीदार मोठी कमान आहे. त्यास दरवाजा असून तो जाड लोखंडी पत्र्याने मढविलेला आहे. या दरवाजाची चौकट नक्षीदार असून मध्यभागी गणेशाची मूर्ती कोरली आहे.

या दरवाजाच्या दोन्ही बाजूस लहान लहान झरोके असलेल्या नक्षीदार दोन उंच भव्य चौकोनी डिझाइनच्या दगडी जाळ्या बसविलेल्या आहेत. त्याचे नक्षीकाम अतिशय सुंदर व नाजूक आहे. शिल्पकलेचा तो एक दुर्मिळ नमुना आहे. त्याचा दुहेरी उपयोग केला जातो. एक, म्हणजे हवा खेळती राहते. व आतील संरक्षक खिडकीसारखा त्यांचा उपयोग होतो.

या पुढील मंडपात सुमारे ८० खांब नानाविध नक्षी व कलाकुसरीने नटलेले आहेत. बाकीच्या चारही मंडपास मिळून सुमारे तितकेच खांब असावेत. खांबांच्या या चक्रव्यूहात माणूस गोंधळून जातो.

आई अंबाबाईच्या मंदिरातील खांब
आई अंबाबाईच्या मंदिरातील खांबesakal
Navratri 2023
Navratri Festival : कोल्हापूरची अंबाबाई आज त्र्यंबोली देवीच्या भेटीला; टेंबलाई टेकडीवर होणार कोहळा फोडण्याचा विधी

अंबाबाईचे महात्म्य वर्णन करताना भाविकगण मंदिराच्या अगणित खांबांचेही वर्णन करीत आले आहेत. 'त्यात खांब मोजिता पंडित मेला' असाही एका कवनांत उल्लेख असून तो सर्वांना परिचित आहे. या बाबतीत थोडे बारकाईने अवलोकन केले तर त्यात बरेच तथ्य आहे असे दिसून येईल.

या खांबांच्या असंख्य पैलूकोनांचा विचार करावा लागेल. ते एका सरळ रेषेत उभे आहेत. या काटकोनी पद्धतीने खुणा करावयाच्या म्हटल्या तरीही एका खांबावर दोन दोन खुणा येण्याची शक्यता असते. शिल्पकाराची ती एक प्रतिभाशक्ती आहे.

म्हणून सर्व खांब एका वेळी एकट्याने मोजणे तर फार अवघड आहे. अशक्य आहे. त्या उठाठेवीत कोणी पडू नये म्हणून की काय, हे खांब मोजल्यावर मृत्यु येतो अशी समजूत फार पुरातन काळापासून रूढ झाली आहे.

(संबंधीत माहिती वा.रा.धर्माधिकारी यांच्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी या पुस्तकातून घेण्यात आली आहे.)

Navratri 2023
Shardiya Navratri 2023 : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आजपासून आदिशक्तीचा जागर; उत्सवकाळात 'असा' चालणार महापूजेचा कार्यक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()