Navratri 2023 : समाजाची बंधनं झुगारून एक ट्रान्सजेंडर बनली कॉलेजची प्राचार्य; वाचा तिच्या खडतर आयुष्याची कहानी!

‘ट्रान्सजेंडर्सनी रस्त्यावर पैसे मागावेत, त्यांनी इतर ठिकाणी लुडबूड करू नये
Navratri 2023
Navratri 2023 esakal
Updated on

Navratri 2023 : नवरात्री म्हणजे आई अंबाबाईचा, माता रेणूकेचा अन् त्यांच्या रूपात समाजातील स्त्रीयांचा सन्मान करण्याचे दिवस होय. नवरात्रीत अनेक महिलांच्या यशोगाथा तुम्ही पहाल, वाचाल. पण समाजातील शोषित घटक असलेल्या ट्रान्सजेंडर्सकडे तुम्ही कधी गांभिर्याने पाहिले नसेल.

रस्त्यावर, जत्रेत, देवीच्या मंदिराबाहेर पैशांच्या बदल्यात तुम्हाला आशीर्वाद देणाऱ्या अनेक तृतियपंथीयांना तुम्ही पाहिलं असेल. जन्मत: पुरूष पण मनाने स्त्री असलेल्या त्याचे स्त्रीरूप अन् श्रृंगार एका महिलेलाही लाजवेल असाच असतो.

सकाळ माध्यमाने समाजातील दुर्लक्षित समाजातील ट्रान्सजेंडर्सची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न यंदाच्या नवरात्रीत केलाय. आपण या मालिकेत देशातील ९ अशा तृतियपंथीयांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या केवळ स्वत:साठी नाहीतर त्यांच्यासारख्याच इतरांच्या हक्कासाठीही पुढाकार घेत आहेत.  (Navratri 2023

Navratri 2023
Navratri Fashion : यंदा नवरात्रीच्या गरब्यात गाजणार मराठी पैठणीचा स्वॅग ; पहाच या अभिनेत्रींचा क्लासी लुक

जेव्हा एखाद्या महिलेच्या यशात अनेक अडथळे निर्माण होतात, तेव्हा आई अंबाबाई सारखी ती महिलाही पाय रोवून उभी राहते. अन् त्या समस्यांचा सामना करते. मग विचार करा जेव्हा समाजाने नाकारलेल्या घटकातील एका ट्रान्सजेंडर महिलेवर संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा तिच्या तेजस्वी यशाने लोकांचे डोळे दिपले जातात.

अशाच आहेत पश्चिम बंगालमधील मानबी वंद्योपाध्याय होय. मानबी एक ट्रान्सवुमन आहेत इतकीच त्यांची ओळख नाहीतर त्या विद्यादानाचे पवित्र कामही करत आहेत. केवळ काम नाहीतर संपुर्ण कॉलेजही जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहेत. (Manobi bandyopadhyay first transgender college principal in west bengal)

मनोबी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य असून ही शिक्षण विश्वातील आणि आपल्या सामाजिक विकासातील महत्त्वाची घटना आहे. शैक्षणिक संस्थेचे नेतृत्व करण्याचा मान मिळवणाऱ्या त्या तृतीयपंथी समाजातील पहिल्या सदस्य आहेत. (Transgeneders)

Navratri 2023
कोडोलीचे ग्रामदैवत अंबाबाईदेवीचे मंदिर नवरात्री उत्सव साठी सज्ज

ट्रान्सजेंडरनी केवळ रस्त्यावर पैसे मागावेत त्यांनी इतर ठिकाणी लुडबूड करू नये, असा विचार करणाऱ्या लोकांच्या तोंडावर मानबी यांनी चपराक मारलीय. मनोबी या सर्व सामाजिक अडथळ्यांना तोंड देत बंगाली भाषा आणि साहित्यात पीएचडी पदवी मिळवली. त्याच विषयाच्या प्राध्यापिका बनल्या.

मनोबी यांनी अनेक माहितीपटांमध्ये काम करण्याबरोबरच त्यांनी 'अंतहीन बंधन' नावाची कादंबरीही लिहिली आहे, जी मोठ्या प्रमाणात विकली गेली आणि वाचली गेली.

या सगळ्या प्रवासात त्यांना अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला. त्यांनी लिंग बदल केले त्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आणण्याचाही प्रयत्न झाल्याचे त्या सांगतात. ‘२००३ मध्ये माझे लिंग बदलाचे ऑपरेशन झाले, तेव्हापासून मला काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. आताही माझ्याविरुद्ध असे प्रयत्न सुरूच होते. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला कायदेशीर मान्यता दिल्यावर हे सर्व बदलले. (Success Story)

लिंग बदल केले त्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आणण्याचाही प्रयत्न झाला
लिंग बदल केले त्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आणण्याचाही प्रयत्न झाला esakal
Navratri 2023
नवरात्री रंगांचे आवाहन करण्यासाठीच्या चौकटीसाठी क्रमांक

कोणत्याही सामान्य माणसाला प्राचार्य पदाच्या जबाबदारीचे दडपण जसं जाणवतं. तसंच मलाही वाटतं. मला जास्तीत जास्त ट्रान्सजेंडर लोकांपर्यंत शिक्षणाचा विस्तार करायचा आहे कारण त्यांना या अधिकारापासून वंचित ठेवले जाते. माझ्यासारख्याच काहींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना समृद्ध बनवायचं आहे, असेही मनोबी सांगतात. 

मी आनंदी आहे. माझ्या आत्म्याला जे हवे होते ते मला मिळाले. पूर्वी माझा आत्मा स्त्रीचा होता आणि माझे शरीर पुरुषाचे होते, आता माझा आत्मा आणि शरीर दोन्ही एक झाले आहेत. सर्वात मोठे आव्हान कुटुंबाकडून येते. कुटुंब हे समाजाचे एकक आहे, त्यामुळे कुटुंबातील लोकांनीच अशा पाल्यांना समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करावे.

कुटुंबातील सदस्यांना समाजात सांगितले जाते की हे मूल षंढ आहे,तो काही कामाचा नाही, त्यामुळे कुटुंबातील लोकही त्या वयात येणाऱ्या पाल्याला रस्त्यावर भिक मागायला सोडून देतात. पण, त्या मुलांनाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()