Navratri 2023 : ट्रेनमध्ये भीक मागून कॅमेरा विकत घेतला अन् बनली फोटो जर्नालिस्ट, ट्रान्सजेंडर जोयाचा प्रवास थक्क करतो

उदरनिर्वाहासाठी ती मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये भीक मागू लागली
Navratri 2023
Navratri 2023 esakal
Updated on

Navratri 2023 : जन्मत: पुरूष असलेले अन् नंतर स्त्री होण्यासाठी धडपडणारे, शस्त्रक्रिया करणारे तृतियपंथी आपल्याला वेगळे वाटतात. त्यांच्याकडे पाहुन फार कमी लोकांच्या चेहऱ्यावर हसू येतं. अन्यथा सगळेच त्यांच्याकडे पाहून नाक मुरडणारे भेटतात.

त्या नजरा अन् शिव्या सहन करत कोणताही सपोर्ट नसताना अनेक ट्रान्सजेंडर्स आपले नशीब स्वत: लिहीतात. त्यापैकीच एक आहे झोया थॉमस. झोयाने केवळ तिच्या अस्तित्वासाठी लढाई लढली नाही. तर ती भारताची पहिली ट्रान्सजेंडर फोटोजर्नालिस्ट बनली.

जसा प्रत्येकाला आदर सन्मान हवाहवासा असतो. तसाच तो ट्रान्सजेंडर्सना देखील हवा असतो. पण फार कमी लोकांच्या नशीबात असे जगणे येते. त्यापैकीच एक झोया.  झोया जिला जगण्यासाठी एकेकाळी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये भीक मागावी लागली होती, पण हार न मानता तिने बचत केलेल्या पैशातून कॅमेरा विकत घेतला आणि एक वेगळी ओळख निर्माण केली.

Navratri 2023
Transgenders Facts : स्वत:चा मृत्यू कधी होणार हे सत्य किन्नरांना आधीच कळत का?

झोयाचा जन्म मुंबईत झाला. सुरुवातीला ती सामान्य मुलासारखी होती. वडील एका सोसायटीत चौकीदार म्हणून काम करून घर चालवत असत. सगळं सुरळीत चालू होतं, मग एके दिवशी झोयाच्या वडिलांचं निधन झालं आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

पडेल ते काम करत झोया मोठी झाली. वाढत्या वयाबरोबर त्याच्या शरीरात अनेक बदल जाणवू लागले. लवकरच तिला ती ट्रान्सजेंडर असल्याचे समजले.

Navratri 2023
Transgender Protest In Pune : राणेंचा 'तो' शब्द अन् तृतीयपंथीयांचा कोप…; रस्त्यावर उतरून केलं जोडे मारो आंदोलन

हे सत्य लोकांसमोर येताच झोयाचे आयुष्य अडचणींनी भरले. वयाच्या 17 व्या वर्षी, झोया एका ट्रान्सजेंडर गटाचा भाग बनली. उदरनिर्वाहासाठी ती मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये भीक मागू लागली. खरे तर तिला काम द्यायला कोणी तयार नव्हते. काही दिवसांच्या संघर्षानंतर झोयाने ठरवले की ती तिचे आयुष्य बदलेल. यासाठी त्याने पैशांची बचत करायला सुरुवात केली.

थोडे पैसे जमा झाल्यानंतर तिने कॅमेरा विकत घेतला आणि फोटोग्राफी सुरू केली. डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली. तेव्हाही ती कॅमेऱ्यातील टेक्निक शिकत होती. या डॉक्युमेंट्रीमधील झोयाचे काम सर्वांनाच आवडले. या कामासाठी तिला सन्मानित देखील करण्यात आले.

Navratri 2023
Navratri 2023 : वडापाव आवडतो पण उपवास आहेत? असा बनवा उपवासाचा बटाटे वडा

लवकरच झोया प्रसिद्धीझोतात आली. नंतर ती एका वृत्तपत्राच्या मालकाला भेटली आणि त्यांनी तू आमच्यासोबत काम केलं तर आम्हाला आनंद होईल असे सांगितले.  

आजवर भिक मागून, बधाई मागत जगलेल्या झोयाला ती एक संधी होती. नशीब बदलवण्याची संधी. ज्यामुळे झोयाला कामाचे तिच्या हक्काचे पैसे मिळणार होते. अशाप्रकारे झोया थोड्याच वेळात एक यशस्वी फोटो जर्नालिस्ट बनली. आज तिचे नाव भारतातील पहिली ट्रान्सजेंडर फोटोजर्नालिस्ट म्हणून घेतले जाते.

Navratri 2023
Navratri 2023 : भक्तांच्या मनोकामना पुर्ण करणारी सटाण्याची महालक्ष्मी माता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()