Navratri 2023 : वडापाव आवडतो पण उपवास आहेत? असा बनवा उपवासाचा बटाटे वडा

तुम्ही केवळ १० मिनिटातही बटाटे वडा बनवू शकता
Navratri 2023
Navratri 2023 esakal
Updated on

Navratri 2023 : देशभरात नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नवरात्रीचा आज आठवा दिवस आहे. या नऊ दिवसात अष्टमीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नवरात्रीच्या उपवासाचा आज आठवा दिवस आहे.

गेली आठ दिवस फराळावर अवलंबून असलेले लोक तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळले आहेत. काही लोकांना त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांची आठवण देखील येत असेल. जेव्हा बटाटे वड्याचा विषय निघतो तेव्हा त्यांनाही आपण वडा खावा असे वाटत असेल.

तर काळजी कशाला करता. तुम्ही देखील बटाटे वडा खाऊ शकता. ही थोडी वेगळी रेसिपी आहे. या चवदार वडापावची रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्ही केवळ १० मिनिटातही बटाटे वडा बनवू शकता. आज आपण उपवासाचा बटाटे वडा कसा बनवायचा ते पाहुयात.  

Navratri 2023
Navratri Vrat Recipe : उपवासात ट्राय करा वरईचे टेस्टी कटलेट, जाणून घ्या रेसिपी

साहीत्य –

  1. बटाटे - ३

  2. मिरची पेस्ट – १ चमचा

  3. मीठ, जिरेपूड कोथंबिर- चवीनूसार

  4. कोटींगसाठी राजगिरा पीठ – लाल तिखट, मीठ

  5. साबुदाण्याचं पीठ - पाव वाटी

  6. वरईचं पीठ - १ वाटी

  7. राजगिरा पीठ - १ वाटी (Upvas Recipe)

Navratri 2023
Navratri Special Recipe : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ट्राय करा झटपट बनणारा बटाट्याचा पराठा

उपवासाचा बटाटे वडा बनवण्याची कृती

  • सर्वात आधी बटाटे उकडून घ्या

  • त्यानंतर ते मॅश करून अथवा किसून घ्या

  • आता त्यामध्ये मिरची पेस्ट, मीठ, जिरेपूड आणि कोथंबिर घालून घट्टसर गोळा तयार करा

  • कोटींगसाठी राजगिरा पीठ, वरीच पीठ आणि साबुदाणा पीठ मिक्स करून घ्या

  • त्यामध्ये मीठ आणि लाल तिखट घाला  

Navratri 2023
Recipe: खवय्येगिरी: गोड, तिखट आणि कुरकुरीतही..!!
  • आता या पिठात पाणी घालून वड्यासाठी लागेल असे बनवा

  • त्यानंतर बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे करून ते या राजगिरा पीठातून काढून तळून घ्या

  • तेल कडक तापवून मगच वडे त्यात सोडा

  • आणि मंद आचेवर तळून घ्या, तरच कोडींग जाडसर येईल, तसेच वडे आतून भाजलेही जातील

  • हिरव्या चटणीसोबत हे गरमा गरम वडे सर्व्ह करा (Navratri 2023)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()