Navratri 2023 : नीरजाने शोधलाय फुटपाथ स्कूलचा नवा फॉर्म्युला, कचरा द्या आणि शिक्षण घ्या

या मुलांना शिक्षणाच्या बदल्यात प्लास्टीकचा कचरा द्यावा लागतो
Navratri 2023
Navratri 2023esakal
Updated on

Navratri 2023 : रस्त्यावर पडलेला कचरा मी का उचलू, मी काही कचरा साफ करणारा नाही, अशी भूमिका तुम्ही आम्ही अनेकदा घेतली असेल. अनेकदा तर आपल्या समोर लोक नदीत कचरा टाकतात. नदी काहीही न बोलता ते वाहून नेते, पण आपल्याला काय करायचंय, तो कचरा आपल्या दारात,घरात तर फेकत नाहीय ना?

असा विचार सगळेच करत नाहीत. म्हणून तर समाजात अशा व्यक्ती घडतात ज्या समाजाचे ऋण चुकवतात. त्यापैकीच एक आहेत इंदिरापुरम, गाझियाबाद येथील नीरजा सक्सेना. घरोघरी, गल्लीत पडलेला कचरा साफ करणं हे काही फार मोठं काम नाही. पण नीरजा वेगळ्या आहेत. (Women Success Story In Marathi)    

Navratri 2023
Navratri 2023 : उपवासाला ‘नो भात, नो पुलाव’; असा बनवा नवरात्री स्पेशल फराळी पुलाव!

गाझियाबादमध्ये गेल्या काही वर्षांपासून फुटपाथ शाळा भरते. या शाळेत दररोज सुमारे 40 मुले शिक्षणासाठी येतात. येथे त्यांना अभ्यासासोबतच जेवण, गणवेश, स्टेशनरी यासारख्या वस्तूही मिळतात, मात्र हे सर्व त्यांना मोफत मिळत नाही. यासाठी जी फी घेतली जाते ती पैशांच्या रूपात नाहीतर जरा वेगळी आहे.  

या मुलांना शिक्षणाच्या बदल्यात प्लास्टीकचा कचरा द्यावा लागतो. होय, एनटीपीसीच्या निवृत्त अधिकारी नीरजा सक्सेना यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या शाळेत शिक्षणासोबतच मुलांना पर्यावरण रक्षणाचे धडेही दिले जातात. त्यांच्या या उपक्रमाचेच फलित आहे की या मुलांनी आजपर्यंत 4000 इको ब्रिक्स बनवून शेकडो किलो प्लास्टिकचा कचरा लँडफिलमध्ये जाण्यापासून वाचवला आहे.  

Navratri 2023
Navratri Festival : गरब्यावरुन पेटला राजकीय वाद; वाद टाळण्यासाठी, महिलांना गरबा खेळू देणार

नीरजा महिन्याला चार इको-ब्रिक्स मोठ्या मुलांकडून आणि दोन लहान मुलांकडून घेते. पर्यावरण प्रेमी असल्याने ती मुलांना प्लास्टिकच्या कचऱ्याच्या धोक्याबद्दल जागरूक करत असते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे येथे येणाऱ्या मुलांच्या विचारसरणीत बदल झाला आहे. एकेकाळी स्वत: कचरा पसरवणारी मुले आता कोणत्याही रस्त्यावर किंवा चौकात पडलेले प्लास्टिक पटकन उचलतात.  

लॉकडाऊनच्या काळात हे काम सुरू करण्याची प्रेरणा नीरजा यांना मिळाली. त्यावेळी त्या जवळच्या वस्तीत जेवण घेऊन जात असत. तिथे त्यांना दिसले की मुलं कुठून तरी खायला मिळवतात, पण शिक्षणापासून ती दूर आहेत. मग नीरजा यांना एक भन्नाट आयडिया सुचली.   नीरजा यांनी त्यांच्या सोसायटीच्या फूटपाथवर एक छोटीशी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. (Navratri 2023)

Navratri 2023
Navratri Festival 2023 : श्री रेणुका मंदिर पायथ्यावर दिवे-कापूर लावण्यास मनाई....

येथे या मुलांना चांगले जगण्याचे, अभ्यासाचे आणि शिक्षणाचे महत्त्व शिकवत आहे. पूर्वी त्या मुलांना मोफत शिकवायची पण नंतर मुलांना पर्यावरणाविषयी जागरूक करण्यासाठी प्लास्टिक कचरा गोळा करण्याची कल्पना त्यांना सुचली.  

या अनोख्या शाळेत केवळ कचरा गोळा केला जात नाही. तर पर्यावरण संवर्धनासाठीही काम केले जाते. नीरजा मुलांसोबत वृक्षारोपण सारखे कार्यक्रमही आयोजित करत असतात. सध्या या मुलांना शिकवून चांगला व्यक्ती बनवणं हेच माझे ध्येय असून. मी हा प्रयोग सुरूच ठेवणार आहे, असे नीरजा सांगतात.  

Navratri 2023
Shardiya Navratri 2023: यंदाच्या नवरात्रीत करा फक्त 'हे' काम, जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.