Navratri 2023  : यंदाच्या नवरात्रीत घडणार दुर्मिळ योग, या तीन राशीच्या लोकांचे भाग्य पालटणार, आदिशक्तीचा वरदहस्त लाभणार

काहींना होणार धनलाभ, तर काहींना मिळणार बढती, पहा तुमची रास यात आहे का?
Navratri 2023 
Navratri 2023  esakal
Updated on

Navratri 2023  : नवरात्रीचा उत्सव देशभरात साजरा केला जातो. नऊ दिवस घटस्थापना करून दहाव्या दिवशी दसरा साजरा होतो. या नऊ दिवसात आदिशक्ती आदीमायेचा जागर, रास गरबा चालतो. गुजरात, कोलकत्तामध्ये दुर्गापूजा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गामातेची उपासना केल्याने सुख, समृद्धी, आनंद आणि सकारात्मकता प्राप्त होते, असे मानले जाते. यंदाची नवरात्री थोडी खास आहे. कारण, गेल्या 30 वर्षांनंतर शारदीय नवरात्रीला एक दुर्मिळ योगायोग घडत आहे.

हा योग काही राशींच्या व्यक्तीसाठी नशिब पालटणारा असणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींवर शारदीय नवरात्रीला दुर्गा मातेच्या आशीर्वादाचा वर्षाव कोणत्या राशीवर होईल. (Zodiac Sings)

Navratri 2023 
Navratri 2023 : नवरात्रीला घटस्थापनेचा योग्य मुहूर्त काय, कोणत्या दिवशी कुठला रंग असणार? इथे वाचा

यंदा पितृ पक्ष १४ ऑक्टोबरला संपेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्री सुरू होईल. यंदा शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू होत असून २३ ऑक्टोबरला संपणार आहे.

असे मानले जाते की या वर्षी दुर्गा मातेचे वाहन गजराज म्हणजेच हत्ती असणार आहे. गज हे शुभ कार्याचे प्रतीक आहे. यामुळे ती संपूर्ण पृथ्वीला आनंद, सकारात्मकता, संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देईल आणि 30 वर्षांनंतर, एक त्रिग्रही योग होईल. योग देखील तयार होत आहेत. शारदीय नवरात्रीला बुधादित्य योग, शाशा राजयोग आणि भद्रा राजयोग तयार होत आहेत. या योगांचा काही राशींना लाभ होणार आहे.

Navratri 2023 
Navratri Festival 2023 : नाशिकच्या ऑर्केस्ट्रा कलाकारांना सुगीचे दिवस! नवरात्रोत्सवात बुकिंग फुल्ल

मेष:

शारदीय नवरात्रीला तयार झालेला त्रिग्रही योग मेष राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकतो. नवरात्रीत मेष राशीचे लोक नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकतात. रिअल इस्टेटशी संबंधित कामातून तुम्हाला नफा मिळू शकतो.

नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला बढती मिळू शकते. व्यावसायिकांना अचानक धनलाभ होईल. अंबामातेच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा होईल.

Navratri 2023 
Navratri 2023: दुर्गापूजेसाठी देवीची मूर्ती घडवताना त्यात वेश्यांच्या दारातली माती का मिसळली जाते?

वृषभ :

वृषभ राशीच्या लोकांना या त्रिग्रही योगांचा खूप फायदा होईल. वृषभ राशीच्या लोकांच्या करिअरसाठी ही नवरात्री खास असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी तुमची प्रशंसा करतील. लोकांना त्यांचे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.

कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते. तुम्‍हाला तुमच्‍या मुलांकडून काही शूभ वार्ता ऐकू येईल.

Navratri 2023 
Navratri 2023: नवरात्रीच्या काळात बंगालमध्ये केले जातात 'हे' हटके पदार्थ, जाणून घ्या सोपी रेसिपी

कर्क

शुभ योगांची त्रिग्रही कर्क राशीच्‍या लोकांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा करतील. राशीला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कोणतेही नवीन काम किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल असेल.

शुभ योगांच्या निर्मितीमुळे तुम्हाला भौतिक सुख, ज्ञान, संपत्ती आणि अध्यात्म प्राप्त होऊ शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. दुर्गा माता सर्व नकारात्मकता दूर करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.