Navratri 2023 : ‘ट्रान्सजेंडर आहे समजल्यावर शाळेनं बाहेर काढलं’ तरीही शिकली अन् खुशी बनली टॉप मॉडेल!

'परिसरातील लोक माझ्याकडे पाहून हसायचे. मला हिजडा-हिजडा म्हणायचे'
Navratri 2023
Navratri 2023esakal
Updated on

Navratri 2023 : ट्रान्सजेंडर्स, तृतियपंथी ज्यांना समाज नेहमीच वाळीत टाकत आला आहे. लोक म्हणतात समाजाला शिक्षित करण्याची गरज आहे. लोक शिकले तर त्यांना समाजातील अशा घटकांबद्दल सकारात्मक विचार करण्याची बुद्धि मिळेल. पण फोल आहेत या संकल्पना. काहीच अर्थ नाहीय.

कारण, आपल्या देशात एक अशी व्यक्ती आहे. जी ट्रान्सजेंडर मॉडेल आहे. पण, तिच्या विद्यादानाचे काम करणाऱ्या शाळेनेच तिच्यावर अन्याय केला. जेव्हा या शाळेला समजलं की आपल्या शाळेत येणारी हा विद्यार्थी ट्रान्सजेंडर आहे तेव्हा कोणताही विचार न करता या विद्यार्थ्याला शाळेत येऊ नकोस, असे सांगितले. इतकेच नाहीतर शाळेने तिचा दाखलाही काढून फेकून दिला.    (Navratri 2023)

Navratri 2023
Navratri Special Recipe : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ट्राय करा झटपट बनणारा बटाट्याचा पराठा

या तरूणीच नाव आहे खुशी शेख. पाचवीत असे पर्यंत तिच्या आयुष्यात सर्वकाही चांगल सुरू होतं. ती इतर मुलांप्रमाणे आयुष्य जगत होती.  पण, शाळेत तिचे सत्य समजले आणि तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला.

या सगळ्याबद्दल खुशी म्हणते की, मला अजूनही आठवते मी लहान असताना. पाहुणे आल्यावर मला घरात लपवण्यात यायचे. मला बघूनच काही लोक हसायचे. मला हिजडा-हिजडा म्हणायचे, पण दिवस बदलतात तसे हे वातावरण काही बदललेले दिसत नाही, असे खुशी म्हणते.

आजही फार काही बदललेले नाही. आजही लोक तृतियपंथियांकडे आदराने बघत नाहीत. पण हे लोक कसे विसरतात, हे मला समजत नाही की ज्याप्रमाणे देवाने तुम्हाला जीवन जगण्यासाठी पृथ्वीवर पाठवले आहे.  त्याचप्रमाणे ही देखील ईश्वराचीच निर्मिती आहे. त्यांच्यावर हसण्याचा अधिकार कोणालाही नाही.

Navratri 2023
Navratri 2023 : चौथी माळ, कुष्मांडा देवी देईल धन संपत्तीहून अधिक महत्त्वाचं दान; अशी करा तिची पूजा

खुशीचा जन्म 11 नोव्हेंबर 1989 रोजी ठाणे, मुंबई येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. ट्रान्सजेंडर मुलाच्या जन्मानंतर पालक रडतात. परंतु तिच्या पालकांनी असे केले नाही. अशा बाळाचे हसत स्वागत करणारे हे पहिलेच पालक असतील. खुशी त्यांचे पहिले अपत्य होते. त्यामुळेच आई बाबांनी खुशी तृतियपंथी असल्याचे सत्य सर्वांपासून लपवून ठेवले.

शाळा सुटली होती त्यामुळे रिकाम्या वेळेत खुशी सिग्नलवर भिक मागायची. एकेदिवशी तिला न्यायाधीश सलमा खान यांनी पाहिले. सलमा या महाराष्ट्र लोकअदालतीच्या न्यायाधीश होत्या. त्या ट्रान्सजेंडर समुदायासाठी ट्रस्टही चालवतात. सलमा खान यांनी खुशीला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या दिवसापासून शेख खुशीने सलमा खानला तिची गुरू म्हणून स्वीकारले.

Navratri 2023
Navratri Festival : कुछ किए बिना जयजयकार नहीं होती! 'या' कर्तबगार महिलांनी उद्योग-व्यवसायात निर्माण केली स्वतःची ओळख

खुशी चांगली डान्सर आहे. जेव्हा हे लोक बधाईसाठी जायचे तेव्हा शेख खुशीला विशेष मागणी होती. त्यानंतर एका ट्रस्टमध्ये काम करून शेख खुशीने मॉडेलिंग करण्याचा प्रयत्न केला आणि मेहनतीच्या जोरावर ती बनली. देशातील पहिली ट्रान्सजेंडर टॉप मॉडेल गेली.

खुशी गेल्या 12 वर्षांपासून देशातील टॉप ट्रान्सजेंडर मॉडेल आहे. खूशी सोशल मिडियावर देखील ऍक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याच्या प्रत्येक पोस्टवर लोक लाईक, कमेंट करतात. तिच्या कार्याला सपोर्ट करतात.

Navratri 2023
Navratri 2023 : दुर्गेची शक्तिपीठे का निर्माण झाली? ती फक्त भारतातच आहेत का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()