Navratri 2023 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंदमातेची पूजा केल्याने मनोइच्छित फळ प्राप्ती होते. तसेच शत्रुंवर विजय प्राप्त होतो. निसंतान असलेल्या जोडप्यांनी स्कंदमातेची आराधना करावी, त्यामुळे त्यांच्या घरात लवकरच पाळणा हालतो अशी माहिती पुराणात दिली गेली आहे.
पार्वती मातेचेच पाचवे रूप हे स्कंदमाता आहे. या देवीच्य मांडीवर पाच मुख असलेले एक बालक आहे. ते कुमार कार्तिकेय आहेत. ज्यांना दुसरे नाव स्कंद असेही आहे. त्यामुळे स्कंदाची माता म्हणून दुर्गेला 'स्कंदमाता' असे ही म्हणतात.
हा देवीला चार हात आहेत. त्यामुळे तिला चारभुजा असलेली देवी असेही म्हणतात. देवीच्या दोन्ही हातात कमळपुष्प आहे तर एका हातात तिने मांडीवर असलेल्या कुमार कार्तिकेयांना पकडले आहे. बाळाला मांडीवर घेऊन ही माता सिंहावर आरूढ होऊन आली आहे.
स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप म्हणजे देवीचा पाचवा अवतार आहे. सगळ्या देवतांमध्ये ह्या देवीचे रूप खूप वेगळे आहे. भगवान कार्तिक यांच्या मांडीवर बसलेले असून देवी कमळ पुष्पावर पद्मासन करून बसलेली आहे. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्यास भक्तांची सर्व पापांतून मुक्ती होते. असे मानले जाते.
भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.
स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (Navratri 2023)
देवीची पूजा कशी करावी
देवी स्कंदमातेच्या पूजेसाठी, कलशाची स्थापना केलेल्या पूजेच्या ठिकाणी स्कंदमातेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आणि तिला फळे, फुले आणि हलकी अगरबत्ती अर्पण करा. पंचोपचार पद्धतीने देवी स्कंदमातेची पूजा करणे फार शुभ मानले जाते. उर्वरित उपासना प्रक्रिया ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा आणि इतर देवींच्या प्रमाणेच आहे.
देवीचा आवडता रंग
मातेला पिवळा रंग आवडतो. त्यामुळे देवीला पिवळ्या रंगाची फुले आणि फळे अर्पण करावीत.
देवीला कोणता नैवेद्य द्यावा
पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्यास आपोआप सर्व सिद्धी प्राप्त होतात. दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला केळी अर्पण केली जातात. या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते. तसेच केसर घातलेली खीरही देवीला प्रिय आहे.
देवीच्या पूजेला या मंत्राचा करा जाप
या देवी सर्वभूतेषु माता स्कंदमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.