गणेशोत्सवानंतर सर्वांनाच वेध लागतात ते नवरात्रीचे. नवरात्रोत्सव म्हणजे तरूण आणि व्रतवैकल्य करणाऱ्या भक्तांसाठी पर्वणीच. नवरात्रौत्सवात व्रत वैकल्यांसोबतच एक वेगळा उत्साह असतो तो रास गरब्याचा. नवरात्री जवळ आली की एका गोष्टीची चर्चा सुरू होते. ती म्हणजे यंदाचे रंग आले का?
नवरात्रीच्या नऊ दिवसात काही खास रंगांची यादी सोशल मिडियावर व्हायरल होत असते. नवरात्री व्रत करणारे अन् सर्वच लोक ते रंग फॉलो करतात. अन् त्याच रंगाचे कपडे नऊ दिवसात परिधान करतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. (Shardiya Navratri 2024)
जो दिवस ज्या देवीला समर्पित असेल तो रंग त्या दिवशी घातला जातो. यंदाच्या नवरात्रीत (Navratri 2024) कोणते रंग आहेत. आणि त्यांचे महत्त्व काय आहे जाणून घेऊयात.
पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतिक आहे. आरोग्यदायी हळद अन् सौभाग्याची हळदही पिवळीच असते. हळदीचे आपल्या जीवनात जसे अनेक फायदे आहेत तसे पिवळा रंगही आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतो.
हिरवा हे निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करते.
राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो.
केशरी रंग सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो. केशरी रंगाचे कपडे परिधान केल्याने, देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची भावना येते.
पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे. देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवारी पांढर्या रंगाचे कपडे घाला.
लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळेच देवीला लाल रंगाचे कुंकू, चुनरी, साडी अर्पण केली जाते.
हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो. नवरात्रोत्सवात गडद निळ्या रंगाचा वापर केल्याने तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल.
गुलाबी रंग प्रेम आपुलकीचे प्रतिक आहे. या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा. ज्यामुळे तुम्हाला जीवनात कधीच प्रेमाची कमतरता भासणार नाही.
जांभळा रंग निष्ठा व स्थिरतेचे प्रतीक आहे. तुम्हालाही जीवनात स्थैर्य हवे असेल तर जांभळ्या रंगाच्या कपड्यांची निवड करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.