Navratri Fashion : आठवडाभरापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी तुम्हाला गरब्यासाठी वेगळा लुक ट्राय करायचा होता. जर तुम्ही दांडिया फंक्शनला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या आउटफिटनुसार अॅक्सेसरीज कॅरी करणं खूप गरजेचं आहे.
तुम्ही चांगला आउटफिट ट्राय करणार असाल तर त्यावर साजेशी ज्वेलरी निवडणेही तितकेच गरजेचे आहे. कारण ड्रेस कितीही सुंदर असला तरी सूटेबल दागिने नसतील तर तर लूक कंप्लिट वाटत नाही.
त्यामुळे दांडिया नाईटसाठी तयार होताना तुम्ही तुमच्या लूकमध्ये कोणत्या अॅक्सेसरीजचा समावेश करावा यासाठीच्या भन्नाट आयडिया पाहुयात.
कोणता ड्रेस बेस्ट आहे
दांडिया रात्रीसाठी लेहेंगा आणि चुनरी सर्वोत्तम असले. तरी, वजनाला हलका लेहेंगा निवडण्याची काळजी घेतली पाहिजे. गरबा किंवा दांडिया खेळताना खूप जड लेहेंगा तुम्हाला अनकन्फरटेबल फिल करवू शकतो.
याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फ्लेर्ड लाँग फ्रॉक कुर्ती निवडू शकता. यामुळे तुम्हाला लेहेंग्यासारखा रिच लुक मिळेल. याशिवाय शरारा कुर्तीमध्येही छान लुक मिळू शकतो.
गुजराती आणि राजस्थानी टच द्या
दांडियासाठी गुजराती आणि राजस्थानी लूक चांगला दिसतो. राजस्थानी लुकसाठी, मिरर वर्क चुनरी घ्या आणि काळ्या स्टोनमधील दागिन्यांचा वापर करा. राजस्थानी लूकसाठी, पारंपारिक डिझाइन केलेला मांग टिक्का नक्कीच घ्या. त्याचप्रमाणे, गुजराती स्टाईलसाठी ओढणी आणि पारंपारिक दागिने ट्राय करा.
केसांची स्टाईल
जर तुम्हाला दांडिया रात्रीसाठी स्पेशल दिसायचे असेल तर तुम्ही केसांमध्ये गजरा घालू शकता. हे तुम्हाला ट्रॅडिशनल लुक देईल. जर तुम्हाला गजरा नको नसेल तर केसांमध्ये खोटी फुले आणि इतर अॅक्सेसरीज जरूर घ्या.
कमरपट्टा
जर तुम्ही दांडिया खेळणार असाल तर कमरपट्ट्याशिवाय तुमचा लूक अपूर्ण दिसेल. त्यामुळे नक्कीच कमरपट्टा बांधा. दांडिया खेळताना आणि गरबा करताना कमरबंध तुमचा लूक आणखी हायलाइट करेल.
हेअर बेल्ट
जर तुम्हाला भारी लुक हवा असेल तर मांग टिक्का ऐवजी माथ्यावर पट्टी घाला. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुली यांच्या लूकपासूनही प्रेरणा घेऊ शकता. अभिनेत्रीने ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परिधान केली आहे. याशिवाय आउटफिटसोबत मॅचिंग फ्लोरल मांगटिकाही मिळू शकते.
हातांना द्या फॅन्सी लुक
तुमच्या लूकला फायनल टच देण्यासाठी तुमच्या हातात बांगड्या किंवा ब्रेसलेट नक्कीच घ्या. यासोबत तुम्ही डायमंड रींग कॅरी करू शकता. हे तुमच्या पारंपारिक लूकमध्ये आकर्षण वाढवेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.