- डॉ. मलिहा साबळे, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, संस्थापक व संचालक - द हेल्दी माइंड
तुम्ही म्हणू शकता, की महिलांचा आत्मविश्वास म्हणजे, त्या जे करतात त्यात त्या चांगल्या आहेत असे वाटणे, किंवा त्या कोण आहेत आणि त्या कशा दिसतात याचा त्यांना अभिमान वाटणे हे असते.
एखाद्या स्त्रीला आतून चांगले वाटते तेव्हा ते बाहेरूनही जाणवते. तुम्हाला स्वतःबद्दल कसे वाटते हे महत्त्वाचे आहे. स्त्रिया सहसा त्यांच्या स्वत:च्या सर्वांत वाईट टीकाकार असतात; परंतु त्यांनी ठरवल्यास त्या स्वतःच्या सर्वांत मोठ्या चाहत्याही असू शकतात. हे सर्व आपल्या दृष्टिकोनावर आणि आपल्या वातावरणावर अवलंबून आहे.