स्त्रियांचे मद्यपान करण्याचे प्रमाण पुरूषांपेक्षा अधिक, अभ्यासात स्पष्ट

सायकॉलॉजी ऑफ अॅडिक्टिव बिहेविअर्स' या जर्नलमध्ये या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत.
Research on Women's Drinking Habit
Research on Women's Drinking Habit
Updated on
Summary

एका नवीन अभ्यासानुसार आता स्त्रियाही तणाव घालविण्यासाठी मद्यपान करत असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे हा अभ्यास सांगतो. (Research on Women's Drinking Habit)

पुरूष आणि महिला दोघही तणावाचा सामना करत असतात. पुरूष त्यांचा तणाव (Stress) मद्यपान, सिगारेट ओढून हलका करतात, असेच पाहिले गेले आहे. तर महिला तणाव सहन करतात. त्याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर दिसायला लागतात. पण एका नवीन अभ्यासानुसार आता स्त्रियाही तणाव घालविण्यासाठी मद्यपान (Drinks) करत असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे हा अभ्यास सांगतो.

या अभ्यासाचे निष्कर्ष 'सायकॉलॉजी ऑफ अॅडिक्टिव बिहेविअर्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. मात्र, दारूचा गैरवापर करण्याचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. तसेच महिलांनाही अल्कोहोलशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका पुरुषांपेक्षा जास्त असतो.

Research on Women's Drinking Habit
तरूणांपेक्षा ज्येष्ठांचे मद्य सेवन करण्याचे प्रमाण अधिक; संशोधनातून माहिती आली समोर
drink
drinkesakal

असा केला अभ्यास (Study)

या अभ्यासात सहभागी झालेल्या महिलांनी (Women's) तणावपूर्ण आणि गैर-तणावपूर्ण परिस्थितींचा अनुभव घेत असताना सिम्युलेटेड बारमध्ये मद्यपान केले. तणावामुळे स्त्रियांना इच्छेपेक्षा जास्त प्यावेसे वाटते. हा निष्कर्ष अल्कोहोलच्या सेवनातील लैंगिक फरकांचा अभ्यास करण्याचे महत्त्व दर्शवितो.

काही लोकं एक किंवा दोन पेग मद्यपान करण्याचा किंवा मद्यपान थांबविण्याचा विचार करू शकतात. तर इतर लोकं मद्यपान करणे चालूच ठेवतात. मद्यपान करण्याचे हे बिघडलेले नियंत्रण अल्कोहोल वापरण्याच्या विकारांच्या सुरुवातीच्या संकेतकांपैकी एक आहे. तणावामुळे मद्यपानावर नियंत्रण कमी होते, हे सर्वांनाच माहिती आहे. याविषयी ज्युली पॅटॉक-पेकहॅम, ASU मधील सहाय्यक संशोधन प्राध्यापक आणि अभ्यासाच्या प्रमुख लेखिका म्हणाल्या की, अनियंत्रित मद्यपानामुळे स्त्रियांमध्ये तणावाचे प्रमाण कमी आहे, असे दिसून आले आहे.

बारटेंडर, बार स्टूल असे एकदम बारसारखी सजावट केलेल्या संशोधन प्रयोगशाळेत हा अभ्यास झाला. यात105 महिला आणि 105 पुरुषांचा समावेश होता. ते वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले, काहींना तणावपूर्ण परिस्थिती दिली गेली तर आणि इतरांना तणाव जाणवणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली. त्यानंतर अर्ध्या लोकांना सहभागींना तीन कॉकटेलच्या समतुल्य अल्कोहोलयुक्त पेय मिळाले. तर उर्वरित अर्ध्या लोकांना नॉन अल्कोहोलिक पेय दिले. सर्व सहभागींना ९० मिनिटांसाठी बारमधून अल्कोहोलिक ड्रिंकवर निर्बंध नव्हते.

Research on Women's Drinking Habit
Liquor License: दारू पिण्यासाठी परवाना का गरजेचा आहे? काय आहेत मद्यपान करण्याचे नियम

असे निघाले निष्कर्ष (This Is The Conclusion)

समस्याग्रस्तांमध्ये मद्यपान करण्यामुळे जीन्स आणि वातावरण दोन्ही भूमिका बजावतात. एएसयू येथील सोशल अॅडिक्शन्स इम्पल्स लॅबचे नेतृत्व करणारे पॅटॉक-पेकहॅम म्हणाले की, तणाव ही अशी गोष्ट आहे जी आपण हाताळू शकतो, तणावामुळे अनियंत्रित मद्यपान होते की नाही याची आम्ही चाचणी केली. चाचणीत आमच्या टीमने एकूण पेये आणि रक्तातील अल्कोहोलचा वापर मोजला. त्यात तणाव असलेल्यांनी साहजिकच जास्त मद्यपान केले होते. मात्र यात महिलांचे प्रमाण जास्त होते. (Research on Women's Drinking Habit)

याविषयी पॅटॉक-पेकहॅम म्हणाले की, पुरूषांना दारू बघताच ती प्यावीशी वाटली. मात्र महिलांना तणाव असल्याने त्यांना पिणे गरजेचे वाटले. मद्यपानाचे परिणाम पुरुष आणि स्त्रियांसाठी समान नसतात. मद्यपान सोडविण्यासाठी आम्ही महिलांना मदत करताना पुरुषांमध्ये विकसित केलेली मॉडेल वापरणे चालू ठेवू शकत नाही,असेही पेकहॅम म्हणाले.

Research on Women's Drinking Habit
'या' मद्यासाठी हेच ग्लास का वापरतात, जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()