आज 2022 वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. तो सर्वांसाठी खूप खास आणि रोमांचक असेल. सरच्या वर्षाला निरोप देऊन नव्या उत्साहात नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत.
गतवर्षीच्या काही चूका सुधारण्यासाठी आयुष्यात काही सकारात्मक बदल करण्यासाठी आपण नव्या वर्षाचे संकल्प करतो.पण, काहीच लोकांना ते पूर्ण करता येतात. नवीन वर्षाचा संकल्प केवळ प्रौढांसाठीच नाही. तर लहान मुलांसाठीही खूप फायदेशीर आहे. नवीन वर्षाचा संकल्प त्यांना त्यांच्याबद्दल विचार करण्याची आणि समजून घेण्याची संधी देतो आणि त्यांना एक चांगली सवय शिकायला मिळते.
मुलांना नेमके कोणते संकल्प सुचवायचे हे पालकांना पडलेले कोडे असते. त्याहुन महा अग्निदिव्य म्हणजे, ते त्यांच्याकडून पूर्ण करून घेणे. त्यामूळे मुलांकडून संकल्प पुर्ण करूण घेण्याची एक सोप्पी ट्रिक पाहुयात.
मुलांकडून संकल्प कसा पुर्ण करून घ्याल
मुलांना नवीन वर्षाचा संकल्प तयार करण्यासाठी आणि त्याच्यासोबत एक गेम खेळू शकता. त्यासाठी, नवीन वर्षात त्यांना एक नवीन डायरी भेट द्या. त्या डायरीत त्यांना येणाऱ्या नव्या वर्षात मुलांना काय करायचे आहे. एखादा खेळ शिकायचा असेल, किंवा एखादा क्लास करायाचा असेल तर ते त्यामध्ये लिहायला सांगा.
मुलांनी लिहीलेल्या गोष्टी पूर्ण करण्यास त्यांमा प्रोत्साहन द्या. मुलांना नवीन वर्षाचे संकल्प करण्याचे आणि पूर्ण करण्याचे महत्त्व समजावून सांगा.
काय असावेत मुलांसाठीचे संकल्प
- मुलांना जुन्या वर्षातील वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- जंक फूड, शीतपेये, चॉकलेट खाणे सोडून रोजच्या आहारात भाज्या, दूध आणि फळे यांचा समावेश करण्यास सांगा.
– व्हिडिओ गेम्स , फोन, टीव्ही आणि इंटरनेटचा वापर मर्यादित करून जास्तीत जास्त शारीरिक हालचाली आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करण्यास सुचवा.
– लहानांवर प्रेम करेल आणि मोठ्यांचा आदर करेल. इतर लोकांशी कधीही गैरवर्तन करू नका आणि आपल्या पालकांचा आदर करण्यास सांगा
– दररोज रात्री झोपण्यापूर्वी अभ्यास करावा. तसेच, दिवसभरातील सर्व चांगल्या वाईट घटना डायरीच्या एका पानावर लिहून ठेवण्यासा सांगा.
मुलांना वाचन आणि वेगवेगळ्या लिखाणाची सवय लावायला सांगा. ज्यामुळे त्यांचे वाचन वाढेल आणि शब्दसंग्रहही वाढेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.