गुगलची न्यू इयर कॅंडी पाहिलीत का? डुडलद्वारे देणार सरत्या वर्षाला निरोप

गुगलनी रात्री 12 वाजता आपले डूडल एका खास पद्धतीने सजवले आहे.
Google Doodle
Google Doodle google
Updated on
Summary

Google हॉलिडे डूडलमध्ये "2021" नावाची एक मोठी कँडी दाखवण्यात आली आहे. नवीन वर्ष 2022 चे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजत असताना ही कँडी पॉप होण्यासाठी तयार दिसत असल्याचे दिसते.

आज 31 डिसेंबर. म्हणजेच 2021या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. जगभरातील सर्व लोक सेलिब्रेशनच्या(New Year Festive Mood) मूडमध्ये आहेत. लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. गुगलही (Google) 2021 वर्षाचा निरोप घेत आहे (गुड बाय 2021). गुगलनी रात्री 12 वाजता आपले डूडल एका खास पद्धतीने सजवले असून सरत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रयत्न केला आहे.

Google हॉलिडे डूडलमध्ये "2021" नावाची एक मोठी कँडी दाखवण्यात आली आहे. नवीन वर्ष 2022 चे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजत असताना ही कँडी पॉप होण्यासाठी तयार दिसत असल्याचे दिसते. डूडलमध्ये 'गुगल' शब्दाची उरलेली अक्षरेही जॅकलाइट्सने रंगीबेरंगी सजावटीसाठी जोडण्यात आली आहेत. शिवाय, डूडलचा उत्सवाचा मूड दाखवण्यासाठी काही अतिरिक्त नवीन वर्षाच्या कॉन्फेटी आहेत.

Google Doodle
नववर्षाची पार्टी घरीच कशी सेलिब्रेट कराल? पाच प्रकार जाणून घ्या
Google Doodle
Google Doodle google

यावर्षीचे डिझाईन साधेच (Simple Design)

या वर्षीच्या गुगल डूडलमध्ये कोणत्याही प्रकारची फारशी सजावट दिसत नाही. त्याऐवजी गुगलने हे डूडल साध्या डिझाइनमध्ये सजवले आहे. 2021 हे वर्ष इथेच संपत आहे आणि आता आपण सर्वजण 2022 च्या नवीन वर्षात प्रवेश करत आहोत, असे त्यातून सांगण्यात आले आहे. याआधी गुगलने सुंदर डिझाईन्सने डूडल सजवत असे. पण, यावर्षी डूडल सोप्या पद्धतीने सजवून 2022 च्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे.नवीन वर्ष सुरू करण्यासाठी शोध इंजिनने डूडलची स्पष्ट आणि सरळ रचना आणली आहे.

Google Doodle
New Year : नव्या वर्षात वापरा कधीही Outdated न होणारे कपडे

कोरोनाच्या सावटाखाली नवे वर्ष

2020 प्रमाणे 2021 हे वर्ष देखील कोरोनाच्या सावटाखाली गेले. यावर्षी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात अनेक लोकांचा बाधा झाली. अनेक लोकांचा मृत्यू झाला. मधल्या काळात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने निर्बंध शिथिल झालो होते. मात्र आता या वर्षाला निरोप देत असताना लोकं पुन्हा कोरानाच्या सावटाखाली आले आहेत. सध्या ओमिक्रॉन या नवीन कोरोना प्रकारामुळे भारतासह संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण आहे.

Google Doodle
NEW YEAR 2022: नवीन वर्षात करा हे आठ संकल्प; यश नक्की मिळेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.