HIV Survey: सेक्शुअल पार्टनरवरून झाला सर्व्हे, घरापासून दूर राहणाऱ्या महिला असतात...

भारतीयांच्या सेक्स लाईफबद्दल अनेक मोठ्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत
Women Facts
Women Factsesakal
Updated on

Women Facts: काही दिवसांआधीच राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्याचे पाचवे सर्वेक्षण झाले. त्यात भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या (HIV) जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या लैंगिक जीवनाशी (NFHS survey) संबंधित अनेक प्रश्न विचारले होते. यामध्ये भारतीयांच्या सेक्स लाईफबद्दल अनेक मोठ्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत.

नॅशनल फॅमिली हेल्थच्या अहवालात असं नमूद करण्यात आलंय की, एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर किंवा घरात राहणार्‍या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याने एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

या सर्वेक्षणात 15-49 वयोगटातील स्त्री-पुरुषांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. महिलांच्या गेल्या 12 महिन्यांच्या लैंगिक जीवनाविषयी प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात 1 टक्क्यांहून कमी महिलांनी (0.3 टक्के) आणि एक टक्के पुरुषांनी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत Physical Relation ठेवल्याचं मान्य केलं.

तर दुसरीकडे अगदी बोटावर मोजण्याइतकी टक्केवारी अशी होती ज्यांनी सांगितले की त्यांच्या पार्टनरव्यतिरिक्त त्यांचे कोणाशीही लैंगिक संबंध नाहीत. जे लोक घरापासून दूर राहातात त्यांच्या एकापेक्षा जास्त व्यक्तींची लैंगिक संबंध असल्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. सुशिक्षित व श्रीमंत भारतीयांमध्ये याचे प्रमाण जास्त असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

घरापासून दूर राहणाऱ्यांची सेक्स लाईफ

जेव्हा लोक घराबाहेर असतात तेव्हा सेक्सशी संबंधित आकडे बदलतात. घरातून बाहेर राहणाऱ्या महिला पुरुषांच्या तुलनेत सेक्शुअली एक्टिव्ह असतात (Women have more sex partners), असं समोर आलं आहे. जेव्हा महिला एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळ घरापासून दूर राहतात तेव्हा त्यांच्या सेक्शुअल पार्टनर्सची संख्या सरासरी 1.7 च्या तुलनेत 2.3 पर्यंत वाढली. (पुरुषांसाठी 2.1 राहते).

Women Facts
Physical Relation : शारीरिक संबंध सुरू असताना बेडवर चुकूनही करू नका या गोष्टी

या अहवालात नमूद केल्यानुसार, 56 टक्के मुलींचं असं म्हणणं आहे की, त्या घराबाहेर किंवा घरापासून दूर असताना सेक्स करतात. तर घरापासून दूर असताना केवळ 32% पुरुष शारीरिक संबंध ठेवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.