No Salt Diet : तूम्ही एक महिन्यासाठी मीठ पूर्णपणे सोडले तर काय होईल?

जेवणात मीठ कमी खावं की खाऊच नये?
No Salt Diet
No Salt Dietesakal
Updated on

No Salt Diet : फिट रहायचं असेल तर हे कमी खा, ते खाऊ नका असं सांगणाऱे अनेक लोक तुम्ही आजवर पाहिले आहेत. तुम्हाला असे लोक घरोघरी भेटतात. पाहुण्यांकडे गेलं तरी सगळे अगदी डॉक्टर असल्यासारखेच आरोग्यावर चर्चा करतात. यातच एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत येतो तो म्हणजे जेवणात मीठ कमी खावं, किंवा खाऊच नये.

आपल्यापैकी बरेच जण मीठ कमी खाण्याकडे लक्ष देत आहेत. पण अशा सल्ल्यांकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं बरं. कारण, मीठ हे एक महत्त्वपूर्ण इलेक्ट्रोलाइट आहे जे आपल्या शरीरास सामान्यपणे कार्य करण्यास मदत करते. जर आपण मीठ कमी खाण्याचा विचार करत असाल. तर ठिक आहे पण मीठ पूर्णपणे बंद करू नका.(No Salt Diet : What if you don't eat salt for a month)

No Salt Diet
White Salt vs Pink Salt: आयोडीन असलेलं शुद्ध मीठ चांगलं की डोंगरातून खणलेलं सेंधवा?

तुम्हीही आजवर असा विचार कधी केलाय का, की एक महिना मीठ खाल्लंच नाही तर काय होईल. याचे फायदे तर काहीच नाही उलट तुम्हाला शारीरिक अन् मानसिक त्रासच जास्त होईल. का ते पाहुयात.

मिठात असणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सोडियम. आपल्या शरीराला हवे असलेले सोडियमची गरज मीठ पूर्ण करते. ज्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजार होऊ शकतात. सोडियम शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करते. इतकंच नाही तर शरीराच्या इतर भागांमध्ये पोषक आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचं ही काम करते. (Health Tips)

No Salt Diet
White Salt : अति मीठ खाऊन आजारपण लावून घेण्यापेक्षा, हा पर्याय आहे उत्तम

मीठ ही अशी गोष्ट आहे जी जास्त खाणे योग्य नाही आणि पूर्णपणे बंद करणे योग्य नाही. एकंदरीत मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करत राहावे लागते. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंडाच्या समस्या, जळजळ, डोकेदुखी आणि डिहायड्रेशन होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, काही लोक मीठ खाण्याचे तोटे जाणून घेतल्यानंतर मीठ खाणे पूर्णपणे थांबवतात. तर असे करणे प्राणघातक ठरू शकते. (Salt)

मीठ का महत्त्वाचं?

मिठाला कुणी पांढरं सोनं म्हणजे व्हाईट गोल्ड असंही म्हणतात आणि मिठावरच्या कराचा विरोध करण्यासाठीच महात्मा गांधींनी काढलेली दांडी यात्राही तुम्हाला आठवत असेल. हे पांढरे स्फटिक जेवणात किती महत्त्वाचे आहेत, हे वेगळं सांगायला नको.

एखाद्या बेचव, अळणी पदार्थात चिमूटभर मीठ घातलं तरी चव लगेच बदलते. त्यामुळे मिठाचा वापर एखाद्या मसाल्यासारखा म्हणजे पदार्थाची चव वाढवण्यासाठी केला जातो. अन्न शिजवण्याच्या आणि साठवण्याच्या पद्धतींमध्येही मीठाचा वापर होतो. रेफ्रिजरेटर येण्याआधी लोणची, फळं, मासे, असे पदार्थ मीठ घालून खारवले जात, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. (Healthy Diet)

No Salt Diet
White Salt : अति मीठ खाऊन आजारपण लावून घेण्यापेक्षा, हा पर्याय आहे उत्तम

असं हे चवीचं मीठ तुम्ही खाणं पूर्णपणे बंद केलं तर तुम्हाला हे त्रास होतील

उलट्या, मळमळ

जर आपण मीठ खाणे थांबवले किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त त्याचे सेवन कमी केले तर शरीरात इलेक्ट्रोलाइट्स असंतुलन होऊ शकते. उलट्या, मळमळ, चक्कर येणे, अतिसार, आळशीपणा, थकवा, मेंदूत सूज, स्नायू कमकुवत होणे, बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

डोकेदुखी वाढते

जेव्हा रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊ लागते तेव्हा हायपोनाट्रेमियाचा धोका वाढतो. त्यामुळे शरीरात जास्त पाणी साठू लागते. जर आपल्याला हायपोनाट्रेमिया असेल तर आपल्याला डोकेदुखी, मळमळ, थकवा यासारखी लक्षणे दिसू शकतात.

हाडे कमकुवत होतात

शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. हाडे कमकुवत झाल्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो. (Monsoon Health Tips)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.