Non Stick Pots : Non Stick भांड्यांमध्ये जेवण बनवणं महागात पडेल, काम सोप्प होत असलं तरी वापरू नका

खराब झालेले नॉन-स्टिक पॅन त्वरित बदला. तुटलेले आणि चिरलेली भांडी जेवण बनवण्यासाठी वापरणे बंद करा.
Non Stick Pots
Non Stick Potsesakal
Updated on

Non Stick Pots :  

आजकाल आपल्याला बरेच आजारांची लागण होते. जे आपण विचारही करू शकत नाही असे आजार आपल्याला होतात. काही गंभीर आजार अन् कधीच न ऐकलेले आजारही आपल्याला होत आहेत. याचे कारण आपले खाणे आणि आपण पित असलेले पाणी आहे. कारण, आपण जेवण कोणत्या भाजीचे, पुरेशी स्वच्छता ठेऊन बनवतो की नाही याचा अधिक प्रमाणात परिणाम होतो.

निरोगी राहण्यासाठी, लोक निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करू लागले आहेत. निरोगी जीवनशैलीचे पालन करण्याचा प्रयत्न करताना, आपण अनेकदा अनेक चुका करतो. हल्ली लोकांमध्ये नॉन-स्टिक भांड्यांचा कल खूप वाढला आहे.

या भांड्यांचा वापर करून अन्न सहज तयार होते. मसाला कुठेही चिकटत नाही किंवा जळत नाही. यामुळेच आजकाल जवळपास प्रत्येक घरात नॉन-स्टिक भांडी सहज उपलब्ध होतात.

Non Stick Pots
Pune Night Life : बाहेरून बंद अन् आतून सुरू, पुणे अपघातानंतर बालेवाडी हायस्ट्रीटवरील पब आणि बार सुधारले नाहीत?

नॉन स्टीक भांड्यांमुळे तुमचे काम सोपे होते ते तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकतात. नॉन-स्टिक भांडी सतत वापरल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. नॉन-स्टिक भांड्यांचे काही तोटे जाणून घेऊया-

नॉन स्टीक भांड्यातून जेवण जेवण्याचे तोटे

नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये PFOA असते. जे विविध आरोग्य समस्यांशी जोडलेले आहे. हे थायरॉईड विकार, मूत्रपिंड आणि यकृत रोग, स्तन, प्रोस्टेट आणि गर्भाशयाच्या कर्करोगासाठी जबाबदार आहे.

पॉलीटेट्राफ्लूरोएथिलिन ला टेफ्लॉन असेही म्हणतात. हे PFOA (perfluorooctanoic acid) वापरून बनवले जाते, जे आरोग्यासाठी विषारी आहे. टेफ्लॉनमध्ये दररोज अन्न शिजवल्याने, हे विषारी रसायन कालांतराने शरीरात जमा होऊ लागते.

Non Stick Pots
Clay Pot : उन्हाळ्यात फ्रिजचं नव्हे तर माठातील पाणी का प्यावं?

ज्यामुळे नॉन-स्टिकमध्ये वापरले जाणारे पीएफसी (पर्फ्लोरिनेटेड केमिकल्स) गर्भधारणेसाठी घातक ठरू शकतात. यामुळे मुलाचे वजन कमी होऊ शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे किंवा प्रीक्लेम्पसिया सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

Non Stick Pots
Clay Pot Benefits: जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर: आरोग्याचीही होत नाही ‘माती'

यावर काय उपाय करता येतील

खराब झालेले नॉन-स्टिक पॅन त्वरित बदला. तुटलेले आणि चिरलेली भांडी जेवण बनवण्यासाठी वापरणे बंद करा.

भांड्यातील क्रॅक गेलेला तुकडा PFOA चा थर असतो. जे अन्न शिजवताना ते अन्न दूषित करतो. हे विषारी पदार्थ सोडतात, जे अन्न दूषित करतात आणि अनेक रोगांना आमंत्रण देतात, 

जरी तुम्ही नॉन-स्टिक वापरत असाल तर अन्न हाय फ्लेमवर शिजवू नका. नॉनस्टिक कूकवेअर उच्च तापमानात शिजवण्यासाठी बनवले जात नाही. म्हणून, मंद आचेवर अन्न शिजवा, जेणेकरून त्याचा धोका टाळता येईल.

नॉन-मेटलिक किंवा लाकडी चमचा वापरा तसेच ॲल्युमिनियमची भांडी टाळा. स्टील, काच किंवा लोखंडी भांडी वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.